पुणे-
मोहरमनिमित्त लष्कर भागात ताबूत स्ट्रीटवरील पेशवेकालीन मानाचा बन्नू मुकादम असुरखाना ट्रस्टचा ताबूत बसविण्यात आला . यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले , हिमाद सय्यद , दिलीप बुधानी , दिलीप सराफ , बन्नू मुकादम असुरखाना ट्रस्टचे अध्यक्ष नजीर खान , सलीम शेख , अमीन शेख , फैजल शेख , झहीर खान , परवेझ शेख , राहील खान , तौसिफ़ शेख , बब्बू शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
भोपळे चौकात मलंग ताजिया कमिटीचा ताबूत बसविण्यात आला . यावेळी मलंग ताजिया कमिटीचे कार्याध्यक्ष अफजल इनायत शेख , अध्यक्ष फैज मेहमूद शेख , इसाक जाफर , रशीद खिजर , अस्लम इसाक शेख , केविन सॅमसन पिल्ले , अमीर इसाक शेख , एडविन सॅमसन पिल्ले वीरू परदेशी , तेजस केदारी , सैफी मोहंमद कुशनवाला आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी रशीद खिजर यांनी सांगितले कि , सुमारे ३३ वर्षांनी ताबूत व गणेशउत्सव एकत्रित बसलेले आहेत . आता सन २०१८ , २०१९ व २०२० ताबूत सलग तीन वर्ष बसतील . हा उत्सव हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन साजरा करतात .
लष्कर भागात बक्कर कसाब ताबूत , दगडू धनगर ताबूत , जमेतुल कुरेशचा ताबूत आदी तंबूत बसविण्यात आले .यावेळी बजमे रेहबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख यांनी ताबूतला शेरा चढवून स्वागत केले .