पुणे- १०० एकरात झाडे लावण्याचा संकल्प करून २४ एकरात ११ हजार झाडे लावण्याची मोहीम नगर रस्त्यावरील वाघोलीजवळील शिंदेवाडी गावाने १ जुलै पासून सुरु केली
गावकरी तसेच शालेय विद्यार्थी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग च्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला . या मोहिमेचा प्रारंभ आर्ट ऑफ लिव्हिंग चे संतोष स्वामी ,हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे, यांच्या हस्ते करण्यात आला .संयोजक प्रभाकर रामराव जगताप सरपंच वैशाली शिंदे, विकास शिंदे, प्रविण जगताप , राजेंद्र भवाळकर ,रसिका भवाळकर ,सायली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते