मुंबई-
१७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या नावनोंदणी अर्जाला सुरुवात
नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकृतींना सन्मान मिळवून देण्यासाठी अविरतपणे कार्यरत असलेल्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार २०१७ च्या नामांकनासाठी नाटक, चित्रपट आणि मालिका विभागाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. आगामी वर्षाच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी दि. २२ डिसेंबर २०१६ ते १५ जानेवारी २०१७ पर्यंत नावनोंदणीचा अर्ज www.sanskrutikaladarpan.com या संकेत स्थळावर तसेच संस्कृती कलादर्पणच्या फेसबुकपेजवर ऊपलब्ध केले जाणार आहेत.
सदर पुरस्कारासंदर्भातील अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेल्या या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे सतरावे वर्ष असणार आहे.