कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
पुणे :
देशरक्षणासाठी शहीद झालेल्या फुरसुंगी येथील स्व. सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुस्लिम सहकारी बँकेच्या वतीने बुधवारी सकाळी २ लाख रुपयांची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे सहानुभूतीपर मदत म्हणून देण्यात आली
.
मुस्लिम को -ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष पी ए इनामदार यांनी संचालक सहकाऱ्यांसमवेत फराटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मदतीचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्त केला.
‘शहीद सौरभ फराटे यांचे बलिदान देश विसरणार नाही. देशबांधव या नात्याने आमचे कर्तव्य म्हणून त्यांच्या कुटुंबियांना आम्ही कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मुस्लिम कॉ ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक मदत केली आहे,
त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात स्व. फराटे यांच्या
मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे
‘अशा शब्दात पी ए इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बँकेच्या उपाध्यक्ष मुमताज सय्यद,
संचालक इम्तियाझ शिकिलगर, लुकमान खान,
मुनावर शेख,
अझीम गुडाखूवाला,
तबस्सुम इनामदार
,
तसेच सामाजिक कार्यकर्ते श्यामराव कुतवळ उपस्थित होते