प्रभाग १३ मधील प्रत्येक घरातील जैव वैद्यकीय कचरा संकलन उपक्रमाचे उदघाटन…

Date:

पुणे-नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि क्रिएटीव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रभाग १३ मधील कचरा प्रभागातच जिरविण्याची आराखडा तयार केला हे कौतुकास्पद असून अश्याच पद्धतीने प्रत्येक भागात छोट्या प्रकल्पांच्या उभारणीतून शहरातील कचरा समस्या सुटण्यास मदत होईल असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
खर्डेकर दांपत्य केवळ आराखडा तयार करून थांबले नाहीत तर त्यांनी सी एस आर ( कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ) अंतर्गत निधी मिळवून आज जैव वैद्यकीय कचरा संकलनाच्या उपक्रमाचे उदघाटन केले हे महत्वाचे असून शहराच्या विविध भागात असे छोटे प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात  येईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून आता नवीन प्रकल्प उभारणीसाठी जागा ताब्यात आल्या आहेत,तेथे योग्य प्रकल्प उभारून शहरातील कचऱ्याचे विघटन केले जाईल पण त्याच बरोबर छोटे प्रकल्प उभारण्यासाठी मी निधीची कमतरता भासू देणार नाही आणि सर्वतोपरी मदत करू असे ही ते म्हणाले.
ग्लोबल ग्रुप,कमिन्स इंडिया,आणि क्रिएटीव्ह फाउंडेशनच्या वतीने प्रभाग १३ मधील प्रत्येक घरातील जैव वैद्यकीय कचरा संकलनाच्या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी,कमिन्स इंडिया च्या उमा अय्यर,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदीप खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,नगरसेविका वृषाली चौधरी,माधुरी सहस्रबुद्धे,उपायुक्त सुनील केसरी,सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान,तसेच भाजपचे पदाधिकारी प्रशांत हरसूले ,कुलदीप सावळेकर,गौरी करंजकर,बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे, स्वाती हिर्लेकर,सुवर्णाताई काकडे,संगीताताई शेवडे,माणिक दीक्षित,प्राची बघते,शुभांगीताई सुदामे,प्रमिलाताई फाले,संगीताताई आडवडे इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी या भागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांच्या सोबत विस्तृत चर्चा केली तसेच प्रभागाचा सर्वे करून येथे साधारण ३५ ते ४० टन कचरा प्रतिदिनी गोळा होतो त्याची विल्हेवाट प्रभागातच लावण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.प्रभागातील जैव वैद्यकीय कचरा ( इंजेक्शनच्या सुया व सिरिंज ,सलाईन किट,मुदतबाह्य औषधें,बँडेज,कापूस,ग्लोव्ज,युरीन बॅग ) यांचे प्रत्येक घरातून संकलन करून हा कचरा पास्को एन्व्हायरॉन्मेंटल सोल्युशन्स च्या कैलास स्मशानभूमी येथील प्रकल्पात विल्हेवाटीसाठी पाठविण्यात येणार आहे,असे ही त्यांनी स्पष्ट केले. ” जैव वैद्यकीय कचरा,इ वेस्ट,झावळ्यांचा कचरा,प्लास्टिक व थर्मोकोलचा कचरा आणि नेहमीच ओला व सुका कचरा असा सर्व कचरा आमचा आम्ही विल्हेवाट लावू शकतो असे नियोजन केले आहे.छोट्या छोट्या प्रकल्पातून कोणालाही त्रास न होता आम्ही प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यात एक वर्षात यशस्वी होऊ असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या,यासाठी फक्त जागा उपलब्ध करून द्यावी ,अनेक कार्पोरेट कंपन्या सी एस आर मधून निधी उपलब्ध करून देण्यास तयार असून याचा कल्पकतेने वापर केल्यास अनेक चांगले प्रकल्प उभारता येतील असे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.
” मी ज्याप्रमाणे रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला,तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये छोटे प्रकल्प उभारण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी सूचना आ मेधा कुलकर्णी यांनी केली.त्यांनी नितीनजी गडकरींचा संदर्भ देऊन सांगितले कि आपला कचरा आपणच जिरवणे ही सुद्धा देशभक्तीचं आहे.त्यासाठी आता नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.तसेच कचरा विघटन प्रकल्पातून जर घाण वास आला नाही,यावर काही उपाययोजना करता आली तर अधिक चांगल्या पद्धतीने नागरिक असे प्रकल्प उभारण्यास पुढे येतील असे ही त्या म्हणाल्या.
या जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेसाठी टेंपो देणारे ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी,संकलनासाठी घरोघरी वेगळे कचऱ्याचे डबे देणाऱ्या व सर्वे करणाऱ्या कमिन्स इंडिया च्या उमा अय्यर,या प्रकल्पाचे नियोजन करणारे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान,पास्को एन्व्हारॉन्मेंटल सोल्युशन्स चे सुनील दंडवते  यांचा ना गिरीशभाऊ बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले,संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले ,गौरी करंजकर,बाळासाहेब धनवे राजेंद्र येडे यांनी स्वागत केले व गणेश सोनुने यांनी आभार मानले,
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....