बेटी बचाओ बेटी पढाओ बरोबरच मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे ही महत्वाचे – सौ मंजुश्री खर्डेकर
पुणे- वस्ती विभागातील मुलींना मोफत रुबेला लसीकरणाचा उपक्रम येथे राबविण्यात आला . .निरामय आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी च्या सहकार्याने कर्वेनगर मधील गोसावी वस्ती येथे आयोजित या उपक्रमाचे भाजपा पुणे शहर सह संघटक व शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले
या वेळी बोलताना सौ .खर्डेकर म्हणाल्या , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेला अनुसरूनच मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे ही महत्वाचे असून त्यासाठीच ९ वर्षांपुढील मुलींना मोफत लसीकरणाची मोहीम राबवली जाते आहे हि आनंदाची बाब आहे , .मी शहरातील सर्व किशोरवयीन मुलींना हे लसीकरण करण्याचे योजिले असून त्यासाठी मनपा शिक्षण मंडळ व पुणे मनपा आरोग्य प्रमुखांची परवानगी घेतली आहे,येत्या वर्षभरात मनपा च्या सर्व शाळा व वस्त्यांमधील मुलींना रुबेला लसीकरण करण्यात येईल असे ही सौ खर्डेकर यांनी स्पष्ट केली.यावेळी भाजप चे कोथरूड मंडळ अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर,महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्ष शशिकलाताई मेंगडे,सामाजिक कार्यकर्ते,विश्राम कुलकर्णी,प्रशांत हरसूले,गणेश पासलकर,माणिकताई दीक्षित,जयेशजी सरनौबत,इ मान्यवर उपस्थित होते.गोसावी वस्तीतील विनोद चव्हाण,सौ पुनमताई चव्हाण,कमलाकर चव्हाण,अनिल आटोळे,रमेश चव्हाण यांनी गोसावी समाजातील वस्तीतील मुलींना व त्यांच्या पालकांना या लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले व तब्बल १०१ मुलीचे लसीकरण करण्यात आले.यावेळी तात्या बालवडकर आणि विश्राम कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमासाठी सौ खर्डेकर यांचे अभिनंदन केले व वस्तीतील मुलींना आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे नमूद केले.वस्तीतील भगिनींनी मंजूताईंना ” आमच्यासाठी ही आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करा ” अशी आग्रही मागणी केली.डा वरदा बर्वे यांच्या टीम ने मुलींना लसीकरण केले.यावेळी अक्खी वस्ती या उपक्रमासाठी लोटली होती. कार्यक्रमाचे संयोजन सौ मंजुश्री खर्डेकर यांनी केले,विनोद चव्हाण यांनी स्वागत केले तर पुनमताई चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.