सह्याद्री ग्रुपच्या सूर्य हॉस्पिटलमधील कोरोना योद्ध्यांच्या वेतनात 10 हजार रुपयांनी वाढ; कामगार नेते यशवंत भोसले यांच्या चर्चेला यश

Date:

पुणे, 16 सप्टेंबर – पुण्यातील शनिवारवाडा कसबा पेठ येथील सह्याद्री ग्रुपच्या सूर्य हॉस्पिटलमधील कायम कर्मचा-यांच्या वेतनवाढीचा 1 जानेवारी 21 पासून करार करण्यात आला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल व्यवस्थापनाशी हा करार झाला. त्यामुळे दोन वर्षांपासून कोरोना काळात काम करणा-या कोरोना योद्ध्यांच्या वेतनात 10 हजार रुपयांनी भरघोस वाढ झाली.

हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीने सह्याद्री ग्रुपचे सल्लागार सदानंद बापट, डॉ. जयसिंग शिंदे यांनी तर कर्मचा-यांच्यावतीने यशवंत भोसले, हॉस्पिटलमधील कामगार प्रतिनिधी गीता राजपुरे, चंदा पवार, किरण साकोरे, गणेश पवार, हर्षदा जाधव, जयवंत महागडे यांनी सहभाग घेतला. या करारामुळे 1 जानेवारी 2021 पासून पुढील 3 वर्षांकरिता पहिल्या पगारापासून एकाच टप्प्यात एकदम 10 हजार रुपये थेटवाढ कर्मचा-यांच्या वेतनात मिळाली. तसेच मागील 8 महिन्यांचा वेतनवाढीचा फरकही कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. यामुळे कर्मचा-यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. भरघोस वेतनवाढ मिळाल्याने कोरोना योद्ध्यांनी यशवंतभोसले आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले.

”कोरोना महामारीच्या काळात या योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या कोरोना योद्ध्यांना भरघोस वेतनवाढ दिल्याबद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आम्ही आभारी आहोत”, असे कामगार नेते यशवंत भोसले यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....