सई ताम्हणकरने विकत घेतली कुस्ती टीम..आता बोला …

Date:

बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मालकीची एखादा खेळाडू संघ असणे, आता नाविन्याचे राहिले नाही, शाहरूख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी ह्या बॉलीवूड स्टार्सच्या आयपीएलमध्ये स्वत:च्या टीम आहेत. तर अभिषेक बच्चनकडे कब्बडी टीम आहे,  मात्र आता पहिल्यांदाच एका मराठी सुपरस्टारच्या मालकीचाही खेळाडूंचा संघ असणार आहे. आणि ती अभिनेत्री आहे, अर्थातच सई ताम्हणकर.

महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. ह्यामूळे आता सई ताम्हणकर अशी एकुलती एक मराठी अभिनेत्री असेल, जिच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे.

सूत्रांच्या अनूसार, सई ताम्हणकर नेहमीच काहीतरी वेगळ करण्याचा विचार करते.. तिच्या ह्या पठडीमोडित काढत, रूढिबध्द नसलेल्या विचारसरणीमूळेच तिने अनेक मोठ-मोठे मानमरातब आजपर्यंत मिळवलेले आहेत. ती मराठी सिनेसृष्टीला लाभलेली ग्लोबल स्टार आहे. आणि तिने एक कुस्ती टीम खरेदी केल्याने आता कुस्तीलाही ग्लॅमर लाभेल, हे निश्चित.

सई ताम्हणकर ह्याविषयी सांगते, “मी मुळची सांगलीची. त्यामूळे कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेशी मी अवगत आहे, पहलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात, किंवा कोणता डाव कधी टाकावा ह्याचे चांगले ज्ञान आहे. पण हे ज्ञान कधी ना कधी अशा पध्दतीने उपयोगाला येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. माझी परिस्थिती नसल्याने मला चांगला व्यासपीठ मिळू शकले नाही, असं कोणताही कुस्तीपटू किंवा कोणत्याही खेळाडूने ह्यापूढे बोलू नये, हाच माझा ही टीम खरेदी करण्यामागे उद्देश आहे.”

सई ताम्हणकर पूढे म्हणते, “ह्या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीमओनर्समध्ये मी एकुलती एक महिला टीमओनर असल्याचा मला अभिमान आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी माझा प्रयत्न असेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.