भारतीय विद्या भवनमध्ये ‘वंडर्स ऑफ वन मॅन ऑर्केस्ट्रा’ ला प्रतिसाद
पुणे : अॅकॉर्डियन आणि सिंथेसायझर या दोन्ही वाद्यांवर एकाच वेळी हिंदी चित्रपटांतील अजरामर गाण्यांची कर्णमधूर लयीची मैफल आज सायंकाळी ‘भारतीय विद्या भवन’मध्ये रंगली. अॅकॉर्डियनिस्ट माधव गोखले यांनी सादर केलेल्या अल्हाददायक वादनात रसिक तल्लीन झाले होते.
निमित्त होते ‘वंडर्स ऑफ वन मॅन ऑर्केस्ट्रा’ या ‘ऑर्केस्ट्रा साउंड ऑफ म्युझिक’ रेश्मा गोखले प्रस्तुत कार्यक्रमा
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ५८ वा कार्यक्रम होता. शुक्रवारी, सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे झाला.
अॅकॉर्डियनिस्ट माधव गोखले आणि गायक रेश्मा गोखले यांची गायन -वादनाची सुरेल मैफल पुणेकरांनी अनुभवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी तर आकाशवाणीवरील खुमासदार प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले.
‘ऐसा मोका फिर कहा मिलेगा’, नीले नीले अंबर, ‘ ए मेरी जोहरा जबी’, ‘मेहबुबा मेहबुबा’ .. , प्यार हुवा इकरार हुवा’, ‘ना चाहु सोना चांदी’ , ‘जाने कहा गये वो दिन’ , ‘आ जा सनम’, ‘दिवाना हुआ बादल’ ही गाणी माधव गोखले यांनी सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली.
गायिका रेश्मा गोखले यांनी ‘कहे झूम झूम’, ‘मेरा नाम चीन चीन चू’, ‘जाई ए आप कहा’, ‘पंछी बनू उडती फिरू’ अशी बहारदार निवडक गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘दम मारो दम’ या त्यांच्या गीताला रसिकांनी जोरदार दाद दिली.
‘ऑर्केस्ट्रा साउंड ऑफ म्युझिक’ चा हा २० वा कार्यक्रम होता. गेली ३५ वर्षे माधव गोखले महाराष्ट्रभरातून अनेक कार्यक्रमाद्वारे वादन करीत आहेत, याची जणू ग्वाहीच या कार्यक्रमाद्वारे माधव गोखले यांनी दिली.