‘एस ए ई इंडिया’च्या वतीने ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2016’स्पर्धेचे आयोजन
‘ए डब्ल्यू आय एम पुणे ऑलिंपिक’द्वारे पुण्यातील विद्यार्थ्यांना वाहननिर्मिती शास्त्रातील प्रयोग करण्याची संधी
पुणे :
‘एसएई इंडिया’ (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘इटॉन टेक्नॉलॉजी’, ‘जॉन डियर’, ‘कमिन्स इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2016’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. 20 शाळांमधून 200 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
शनिवार, दि. 10 डिसेंबर 2016 रोजी या ‘ए डब्ल्यू आय एम पुणे ऑलिंपिक’चे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती माहिती डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया) यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद लोधी (एच आर विभागप्रमुख, इटॉन इंडिया इंजिनिअरींग) असणार आहेत. यावेळी बी.व्ही. शामसुंदर (‘एसएई इंडिया’वेस्टर्न सेक्शन), रितू राज (व्यवसाय संचालक, जॉन डियर), श्रीनिवास राघवन (कमिन्स), एन.पी.वाघ (सचिव, ‘एसएई इंडिया’वेस्टर्न सेक्शन), ललितकुमार सूर्यवंशी, प्राचार्य जयश्री वेंकटरमण (एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल), अमित अगरवाल आदी उपस्थित राहणार आहेत.
‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2016’ एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल (सर्वे नं. 29/2, पिंपळे सौदागर, लिंक रोड, आकाशगंगा सोसायटी जवळ, रहाटणी, पिंपरी चिंचवड, पुणे – 27) येथे होणार असून, याचे उद्घाटन सकाळी 8.30 वाजता होणार आहे. ‘जेट टॉय’ निर्मिती स्पर्धेत 39 संघ सहभागी होतील. ‘स्किमर निर्मिती’ स्पर्धेत 11 संघ सहभागी होतील.
देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धांमधून देशाचे भावी ‘इंजिनियर्स’ घडणार आहेत.
पुणे ऑलिंपिक स्पर्धेतील जेट टॉय स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ तसेच स्किमर स्पर्धेतील विजेता संघ ‘अ वर्ल्ड इन मोशन राष्ट्रीय ऑलिम्पिक 2016’ स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. ही स्पर्धा जानेवारी 2017 मध्ये ‘हॉटेल मॅपल एमरल्ड’ (न्यू दिल्ली) येथे होणार आहे.