Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रंगली इर्शाद खान आणि पं. गणपती भट यांच्या मुलाखतींची मैफल

Date:

 

पुणे,  : पुण्यात होणा-या संगीत क्षेत्रातील सर्वांत मोठ्या अशा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सावात सादरीकरण करण्यासाठीच आम्ही कलाकार ‘रियाज’ करत असतो. या व्यासपीठाची पुण्याई इतकी मोठी आहे की देशात नाही तर परदेशातही या व्यासपीठाच्या आठवणी अनेक रसिक आणि कलाकार काढतात, अशा भावना सूरबहार वादक इर्शाद खान आणि गायक पं. गणपती भट यांनी व्यक्त केल्या.

निमित्त होते ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सावा अंतर्गत शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकात होणा-या ‘अंतरंग’ या कार्यक्रमाचे. दरवर्षी ‘अंतरंग’ दरम्यान प्रसिद्ध कलाकारांच्या प्रकट मुलाखतींचे आयोजन करण्यात येते. याच दरम्यान आज सूरबहार वादक इर्शाद खान आणि गायक पं. गणपती भट यांच्या मुलाखती निवेदक मंगेश वाघमारे यांनी घेतल्या.

आर्य संगीत मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना इर्शाद खान म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सावात सादरीकरण करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. या व्यासपिठासारखे व्यासपीठ भारतात आणि जगात कुठेही नाही. या ‘लिजंडरी’ महोत्सवात सादरीकरणाची संधी आम्हाला मिळते आहे हे आमचे भाग्य आहे.‘’

एखादं वाद्य बनवायला खूप मेहनत आणि लगन लागते. आजचा जमाना हा इंस्टंट गोष्टींचा आहे. याचा फटका वाद्यनिर्मितीला बसत असलेला पहायला मिळतो याचे वाईट वाटते, असे मतही यावेळी इर्शाद खान यांनी व्यक्त केले. आज भारतात साज तयार होत असले तरी त्याच्या तारा या अजूनही जर्मनी मधून आणाव्या लागतात. भारतात या गोष्टी बनल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना सुरवातीला सतारवादन आणि नंतर मी गायनाकडे वळालो. गुरुंच्या आशीर्वादाने इथंवर पोहोचलो असे सांगत पं. गणपती भट यांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, “आज नवीन पिढी संगीत क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टीकोनामधून पाहत आहे. ते चुकीचे आहे. जोपर्यंत गुरू सांगत नाहीत तोपर्यंत कलाकाराने सादरीकरण करू नये असे मला वाटते. संगीत ही एक साधना आहे. त्यातून कलाकाराने स्वत: आनंद घ्यावा व रसिकांना आनंद द्यावा. ’’

संगीत ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही संपणार नाही. ती चिरतरुण आहे. आमच्यासारखे अनेक कलाकार येतील जातील. रसिक वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या या संगीताचा रसास्वाद घेतील. त्यामुळे संगीत हा एक सागर आहोत आणि त्यासमोर आपण कोणीही नाही या भावनेने कलाकाराने वागले पाहिजे. कलाकाराला त्याची मर्यादा समजली पाहिजे कारण हे क्षेत्र समुद्रासारखे अथांग आहे, असेही मत यावेळी पं. गणपती भट यांनी व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...