केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोला मंजुरी दिल्यानंतर पुणे शहर भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते. उपस्थितांना पेढे वाटून, बँड वाजवून, स्पिकरवर देशभक्तीपर गाणी लावून आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हा विजय असल्याचे मत श्री गोगावले यांनी यावेळी व्यक्त केले
केेद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रतिकि‘या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोला मान्यता देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल. मेट्रो मंजुरी साठी गेल्या अडीच वर्षांत विशेष प्रयत्न करण्यात आले. काँग‘ेस आघाडी सरकारला मेट्रोला मंजुरी देण्यात गेली दहा देण्यात अपयश आले. आता भाजपने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग‘ेस करीत आहे. त्यांच्या या नतभ‘ष्टतेला पुणेकर जनता नक्की धडा शिकवेल. पुणे महापालिकेतील गटनेत्यांनी केलेला ठराव शरद पवार साहेबांना माान्य आहे का
सोबत छायाचित्रे जोडली आहेत
पालकमंत्री गिरीश बापट यांची प्रतिकि‘या
पुणे शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गेली दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे मेट्रोला मान्यता मिळाली आहे. यासाठी प्रयत्न करणार्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो व आभार मानतो. पुणे मेट्रो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. का प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक निधी कमी पडू देणार नाही. निवडणुकीत पुणेकरांना दिलेली आश्वासने पाळण्यात आम्ही कटिबध्द आहोत. मेट्रोच्या निर्णयामुळे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. पुणेकरांनी सुलभ, सुरक्षित व गतीमान वाहतुक व्यवस्था देण्यास आम्ही कार्यरत राहणार आहोत