Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फेब्रुवारी/मार्च-2017 मध्ये होणाऱ्या 12 वी परिक्षांच्या अतिविलंब शुल्कासह आवेदन पत्र सादर करण्याच्या तारखा जाहिर

Date:

 

 

पुणे,- सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की विलंब शुल्कानंतरची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे स्वहस्ताक्षरात भरुन त्यावर विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह पुढील तारखांप्रमाणे व शुल्काप्रमाणे विभागीय मंडळात सादर करावयावी.

फेब्रुवारी व मार्च -2017 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) ची आवेदन पत्रे अतिविलंब शुल्कासह दाखल करण्याची  अंतिम मुदत,  रुपये 50/- प्रतिदिन प्रतीविद्यार्थीप्रमाणे  8 डिसेंबर, 2016 ते  8 जानेवारी, 2017 पर्यत स्विकारण्यात येतील.

विशेष अतिविलंब शुल्कासह रुपये 100/- प्रतिदिनी प्रतीविद्यार्थीप्रमाणे  रविवार, 8 ते 23 जानेवारी, 2017  दरम्यान आवेदन पत्रे स्विकारण्यात येतील. अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रुपये 200/- प्रतिदिनी प्रतीविद्यार्थीप्रमाणे 24 जानेवारी, 2017 ते 7 फेब्रुवारी, 2017 पर्यत आवेदन पत्र स्विकारण्यात येतील. सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त तारखांनुसार व शुल्कानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच विभागीय मंडळ निश्चित करेल त्याच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यास परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्याचा निकाल इतर विद्यार्थ्याबरोबर जाहीर होऊ शकला नाही तर विद्यार्थी त्यास हरकत घेऊ शकणार नाही असे हमीपत्र ‍विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे. मंडळाकडे विद्यार्थ्याकडून परस्पर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.तसेच ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी असे मंडळाचे विभागीय सचिवांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...