Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोरोनाचा फैलाव रोखण्यास सत्ताधारी भाजप गंभीर नाही -महाविकास आघाडीचा आरोप (व्हिडीओ)

Date:

पुणे- शहरात मार्च महिन्यापासून वेगाने होणाऱ्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सत्ताधारी भाजप सर्व पातळीवर अपयशी ठरला असून आपण नेमके यासाठी केले तरी काय ? याचे आत्मपरीक्षण महापालिकेतील भाजप ने करण्याची गरज आहे .हा फैलाव रोखण्यास गंभीर न राहता स्थानिक पातळीवर त्यांनी थातूर मातुर कामे केल्याचा आरोप करत आज सर्व विरोधी पक्षांनी महापालिका आयुक्तांशी या विषयावर केलेल्या चर्चेची आणि काही उपाय योजना आवश्यक असल्याची माहिती येथे कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल आणि शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी ‘माय मराठी’ ला दिली

-काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, विरोधी पक्षनेत्या सौ.दिपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराजसुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, .महापालिका आयुक्त, शहर अभियंता.आरोग्य प्रमुख, मुख्य लेखापाल,आरोग्य विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात आज दि.३१/७/२०२० रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व पक्षाचे गटनेत्यांच्या मागणीनुसार खालील विषयांबाबत दोन तास बैठक झाली. यामध्ये खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली

.१.कोविड संदर्भात पुढील ३ महिन्याचे नियोजन

२.कोविड संदर्भात केंद्र व राज्य शासनाचे अनुदान

३.चालू वर्षांतील जमा खर्च माहिती

४.बजेटमधील विकासकामे

५.मनपा मिळकतींची देखभाल दुरुस्ती

६.एचसीएमटीआर रस्ता

७.आंबिल ओढा सिमाभिंत


आबा बागूल यांनी पुणे शहरातील कोरोना रुग्णांना  वेळेवर बेड उपलब्ध होत नसून रुग्णांचे हाल होत आहेत असे आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले व याबाबत उपाय योजना करणेबाबत चर्चा केली.यावेळी आयुक्तांनी पुणे शहरातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणेसाठी २४ बाय ७ पुणे मनपाचे अधिकारी 3 शिफ्टमध्ये खाजगी रुग्णालयात बसून त्याठिकाणी असलेले आयसोलेशन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर याची उपलब्धतादैनंदिन जाहिर करण्यात येईल. तसेच प्रत्येक खाजगी रुग्णालयात असलेले अधिका-यांचे नंबर जाहिर करणार असे आयुक्त साहेबांनी  सांगितले. याबाबत पुणे मनपाचा डॅशबोर्ड तयार करून दैनंदिन पब्लिश केले जाईल असे आयुक्तांनी आश्वासितकेले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या सौ. दिपाली प्रदीप धुमाळ व सर्व पक्षाचे गटनेते यांनी कोविड संदर्भात पुढील ३ महिन्याचे नियोजनाचा आराखडा तयार करा अशी मागणी केली असता १ महिन्याचा आराखडा २ दिवसात तयार देणार असे आयुक्तांनी सांगितले. यामध्ये कोरोना साठी भविष्यात किती खर्च येणार, किती बेड लागणार व तदनुषंगिक माहितीचा सविस्तर अहवाल २ दिवसात देतो असे आयुक्त यांनी  आश्वासित केले.
बिगर कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा चेस्ट एक्स-रे काढल्यास मयताच्या छातीचे काळे डाग आल्याचे दिसून येत आहे, असे साधारण १ हजार मृत्यूची आकडेवारी प्रशासनाकडून लपविण्यात आली आहे का? याबाबत पुणे शहराचे महापौर यांनी काल दि.३०/७/२०२० रोजी पुणे शहरात आजपर्यंत १००० रुग्णांचे संशयित मृत्यु झाले असे जाहिर केले असून त्याबाबत आयुक्त यांना  विचारणा केली असता त्यांनी पुणे शहरात असे १००० संशयीत मृत्यु झाले किंवा लपवले गेले असे काही झालेले नाही असे ठामपणे सांगितले. याबाबत मी महापोरांशी चर्चा करतो व याबाबत ससून सर्वोचपार रुग्णालयाकडे पत्र पाठवून माहिती घेतो असे  आयुक्त यांनी  सांगितले
पुणे मनपाचे सीसीसी सेंटर मध्ये १२००० बेड उपलब्ध असून त्यामध्ये ४००० रूण अॅडमिट असून 8000 बेड रिक्त आहेत अशी धक्कादायक माहिती मिळाली असून यामध्ये किमान ३००० बेड ऑक्सिजनचे बेड तातडीने तयार करावेत अशी मागणी  बागूल यांनी केली. जेणेकरून ऑक्सिजन विना मृत्यु कोणाचाही होणार नाही. यासाठीकिमान २ ते ३ कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ६७, ३, क नुसार कार्यवाही करणेस हरकत नाही असे सर्व पक्षाचे गटनेते यांनी सांगितले. बागूल यांनी कोरोना झाल्यावर उपचार करतो परंतू कोरोना होवू नये यासाठी नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, व्हिटॅमिन, मल्टीव्हिटामिन, बी १२ हीऔषधे व गोळया वाटप करणेबाबत मी सातत्याने लेखी पाठपुरावा करीत असून याबाबत आयुक्तांनी प्रशासनास पुढील कार्यवाही करणेस आराखडा तयार करणेस सांगितले. यानुसार आजपर्यंत ५०००० औषधे व गोळ्यांचे किट वाटप करण्यात आले आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानुसार पुणे शहरातील झोपडपटटी वसाहती व अन्य ठिकाणच्या नागरिकांना आर्युवेदिक, होमिओपथिक, व्हिटामिन औषधे व गोळ्या वाटप करणार असा निर्णय घेण्यात आला.शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे नागरिकांचे उत्पन्नथांबले असून खाजगी रुग्णालयात नागरिक अॅडमिट होणेस गेले असता त्यांचेवरील उपचाराचा खर्च करणेस पैसे नसतात, ही वस्तुस्थिती असून त्यासाठी पुणे शहरातील सर्व नागरिकांचा, प्रत्येक मिळकत धारकाचा कोरोनाचा विमा किमान ६ महिन्यासाठी करणार, जेणेकरून त्या अंतर्गत उपचाराचा खर्च होवून यामुळे मनपाची आर्थिक बचत देखील होईल. सर्वसामान्य उपचारासाठी गेला असता त्यास जागा उपलब्ध होत नाही व विमा असणाऱ्यास जागा मिळते, ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी याबाबत खातेप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेतो असे आश्वासन दिले.
पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मध्यांतरी एक कोविड विमा योजना सुरक्षा कवच योजना काढली होती त्यामध्ये महापालिका ५० लाख व केंद्र सरकारकडून ५० लाख रू. देण्यात येणार होते. परंतु काही कारणास्तव केंद्र सरकारकडून ती योजना नाकारण्यात आली. यावेळी महापौरांची सुरक्षा कवच योजनेची घोषणा होत राहिली असे आबा बागूल म्हणाले. यावेळी कमीत कमी मनपाचे ५० लाख व वारसास नोकरी बाबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतो असे आयुक्तांनी सर्व पक्षाचे गटनेते यांना आश्वासित केले.पुढील ३ महिन्याच्या उपाय योजनाबाबत पुणे शहरात जम्बो रूपालय उभारणार असून यामध्ये सध्या ८०० बेड
उपलब्ध आहेत त्याऐवजी २४०० बेड उपलब्ध करुन देण्यात येतील. १८०० ऑक्सिजन बेड आणि ६०० आयसीयु चे बेड उपलब्ध करून देण्याबाबत उपाय योजना करण्यात येत आहे असे आयुक्त म्हणाले. तसेच कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या १० टक्यांनी वाढविणार आहोत. याबाबत चर्चा करताना पुणे शहराच्या हिताच्या निर्णयाबरोबर आम्ही ठामपणे आहोत असे सर्व पक्षाचे नेत्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतनिधी उपलब्ध व्हावा म्हणून एक सक्षम अधिकारी नेमावा किंवा तसा सेल निर्माण करून याबाबतचा दैनंदिन फालोअप घ्यावा. तसेच या सेल मधून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून पुणे
महानगरपालिकेस किती अनुदान येते, मदतनिधी व साहित्य येते याबाबत देखील पाठपुरावा करता येईल. जेणेकरून पुणे महापालिकेस मिळणारी रक्कम वेळेत मिळेल. फक्त पत्राद्वारे अनुदान, निधी, सहाय मदत मिळणार नाही, त्यासाठीस्वतंत्र कक्ष उभारल्यास प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होईल असे सर्व पक्षाचे गटनेते यांनी सांगितले, यावरआयुक्तांनी यावेळी यासाठी खातेप्रमुख नेमतो असे सांगितले.पुणे महानगरपालिका विविध विभाग उदा,पाणी पुरवठा, उद्यान, अतिक्रमण, सुरक्षा, शिक्षण विभाग इ.ठिकाणी जेथे ठेकेदार पध्दतीने व तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ पुरवठा करण्यात येतो, अशा ठिकाणची टेंडर संपली असून देखील
मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्या कामगारांचे वेतन त्यांना व्यवस्थित होण्यासाठी याला ६महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशी चर्चा झाली. शिक्षण मंडळाकडील सेवकांना तातडीने कामावर घेण्यात यावेत्यांची उपासमार होत आहे. यासाठी आयुक्त यांनी  होकार दिला आहे. तसेच पुणे शहरातील मनपाच्या वास्तूंची देखभाल दुरूस्ती बंद असून नाट्यगृहे, शाळा, वास्तू बंद असून त्यांची देखभाल दुरुस्ती करणेसाठी निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करतो असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी पुणे शहरातील विकासकामांबाबत विचारणा केली असून पुणे महानगरपालिकेकडे आज रोजी २५०० कोटी उपलब्ध आहेत अशी माहिती सर्व पक्षाचे गटनेते यांनी आयुक्त यां च्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आयुक्त यांनी नगरविकास विभागाशी चर्चा करून २ दिवसात निर्णय घेतो असे आश्वासित केले.
शहरातील अत्यंत महत्त्वाचा एच.सी.एम.टी.आर.योजनेबाबत आबा बागूल यांनी विचारणा केली असून आयुक्तांनी याबाबत मी प्रशासनाकडून एच.सी.एम.टी.आर योजनेची माहिती घेऊन आपणास कळवितो, असे आयुक्त यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेने मागील चार महिन्यात ६७-3 (क) अंतर्गत अंदाजे २२५ ते २५० कोटी रू. कोविडउपाययोजनेवर खर्च केले आहेत. मग महानगरपालिकेने इतका खर्च करून देखील हे प्रशासनाचे अपयश आहे का?त्यामुळे या सर्व कामांची तपासणी ऑडीट करावे अशी मागणी बागूल यांनी केली.बालेवाडी किंवा इतर कोविड सेंटर्स वर नागरीकांना योग्य त्या अद्यापही सुविधा नसल्याचे पृथ्वीराज सुतार,
सौ. दिपाली धुमाळ, विरोधी पक्षनेते यांनी बैठकीमध्ये सांगितले. यावेळी राजेंद्र मुठे, उप आयुक्त यांच्याकडून शहरातील विविध कोविड सेंटर्स बालेवाडी, सणस ग्रांड, अवेटेड कोविड सेंटर मधील बेडसची उपलब्धतता यांची माहिती दिलीडॅश बोर्ड, कंट्रोल रूम किंवा महानगरपालिका अधिकाऱ्यांनी किती रुग्णांची दूरध्वनी स्वीकारून त्यांना बेड उपलब्ध करुन दिले? याबाबतची माहिती सर्व पक्षाचे गटनेते यांनी विचारली असता प्रशासनाकडून सर्व माहिती २ दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले.
कोरोनामुळे घबराट झाली असून प्रत्येक नागरीक तपासणीसाठी येत आहेत, त्यामुळे यंत्रणेवरील ताण व खर्च वाढत आहे. त्याऐवजी पूर्वी जसे लक्षणे असतील तर तपासणी केली जात होती. त्या पध्दतीने अंमलबजावणी करावी, असे पृथ्वीराज सुतार, वसंत मोरे यांनी सांगितले. यावर आयुक्तांनी अन्टीजेन रपिड, स्वैब टेस्ट इ.चाचण्या मोठ्या प्रमाणात करून कोरोना रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करणे महत्वाचे असल्याने या चाचण्या मोठ्या प्रमाणात करणे, हे अतिशय महत्वाचे आहे असे आयुक्त यांनी सांगितले. यावर तपासणी नंतरची सुविधा सुध्दा महापालिकेने केली पाहिजे. त्याचे नियोजन केले पाहिजे, याकडे पृथ्वीराज सुतार यांनी लक्ष वेधले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...