पसायदानाचे शिल्प आळंदी येथील नामदेव शिंपी धर्मशाळेस भेट
पुणे : नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पसायदान शिल्पाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आळंदी येथील नामदेव शिंपी धर्मशाळेस पसायदान शिल्प भेट देण्यात आले. शिल्पकार अशोक काळे यांनी हे शिल्प साकारले आहे.
प्रकाशन करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी पसायदान शिल्पाचे पूर्ण वाचन केले. यावेळी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्या वतीने त्यांचा पुणेरी पगडी, शाल श्रीफळ व माता जिजाऊ सोबत बाल शिवाजी यांची मूर्ती भेट देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी नामदेव समाजोन्नती परीषदेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर, पुणे शहराध्यक्ष संदिप लचके, शिल्पकार अशोक काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अजय शिंदे, पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी समिती पुणे शहर अध्यक्ष अॅड. सतीश कांबळे, ना.स.प. पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष सोमनाथ मेटे, मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते, सहसचिव विजय कालेकर, खजिनदार अक्षय मांढरे, सल्लागार सुभाष पांढरेकामे, कैलास देवळे, स्वप्निल खुर्द, संजय वैद्य, महाराष्ट्र मनसे सैनिक धनंजय दळवी व शिंपी समाज बांधव व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.