बंडखोर तानाजी सावंतांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी, पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची शक्यता

Date:

मुंबई/पुणे – शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची प्रभारी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात बंडखोर एकनाथ सावंतांना जाऊन मिळत असलेल्या शिवसेनेतील पदाधिकार्यांचीही दखल शिवसेनेच्या मुंबई गोटातून घेण्यात येत असून आज सायंकाळी त्यांची हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी वाट पकडल्याने शिवसेनेत गळतीच सत्र सुरू झाले आहे. यात शिवसेनेकडूनही बंडखोरांवर कारवाईचा बंडगा उगारल्या जात आहे. यातच शिवसेनेने तानाजी सावंत यांना धक्का देत त्यांचे पद काढून घेतले आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची नियुक्ती झाल्याचे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. तर मुख्य म्हणजे कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याची देखील उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतले नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात

कोण तानाजी सावंत ?

खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट म्हणून तानाजी सावंत यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. पुणे जिल्ह्य़ात इंजिनीअिरग, फार्मसी अशा विविध महाविद्यालयासह त्यांचे 3 खासगी साखर कारखानेदेखील आहेत. रियल इस्टेट व्यवसायातही त्यांचा भलामोठा वावर आहे. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेश करताच यवतमाळमधून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करत शिवसेनेचे उपनेतेपद दिले हाते. यानतंर हळूहळू त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेवर पकड मजबुत केली होती. मात्र 2019 मध्ये त्यांना मंत्रीपद न दिल्याने त्यांची पक्षाची नाराजी होती. मात्र शिवसेना पक्ष प्रमुखांनी समजूत घातल्यानंतर ते पक्षात सक्रिय झाले होते. ​​​

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...