मुंबई- विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या ५३ आमदारांमध्ये शिंदे गटातील ३९ आणि उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या १४ आमदारांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख नाही.त्यांच्याबाबत शिंदे यांच्या ‘तथाकथित ‘गटाने तक्रार न केल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.
राज्यपालांच्या निर्देशानुसार, ३ जुलैला विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली, तर ४ जुलैला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे प्रमुख असलेल्या मुळ शिवसेनेने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं होतं तर याच शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या ‘तथाकथित ‘ गटाने भाजपाच्या बाजूने मतदान केलं होतं यानंतर दोन्ही गटांकडून व्हिपचं उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर द्यावं लागणार आहे.