पुणे : नवी दिल्लीहून पुण्याला रात्री उशिरा आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात खासदार गिरीश बापट आणि त्यांच्या समवेत आलेल्या शिवसेनेतील पदाधिकार्यांना भेटून मी पुन्हा येतो असे आश्वासन देऊन नंतरच पंढरपूरकडे विठ्ठलाच्या पूजेसाठी रवाना झाले . पुण्यात आल्यावर त्यांचे शिंदेशाही पगडी घालून आज पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे, किरण साळी, अजय भोसले उपस्थित होते.नाना भानगिरे यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती , काल रात्री त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते ते मात्र उपस्थित नव्हते .पुणे शहरात पडलेल्या फुटीने शिवसेनच्या वर्तुळात आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली जाते आहे. निवडणुकीत शिवसेनेचा मतदार आता बंडखोरांना साथ देईल कि ठाकरे कुटुंबांसमवेत एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांना साथ देईल याचे उत्तर येत्या आगामी काळात मिळणार आहेच .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते आणि कालरात्री ते पंढरपूरला गेले . दिल्लीहून येताना काही काळासाठी ते पुण्यात थांबले होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे.या धावत्या भेटीनंतर पुणे शहरातील शिवसेनेला मोठं खिंडार पडलेले दिसले आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी हे एकनाथ शिंदे समवेत होते . युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे ते आपला राजीनामा देणार आहेत. त्याचबरोबर पुणे शहराचे सह संपर्क प्रमुख अजय भोसले देखील त्यांच्या समवेत होते. त्यामुळे पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. याआधी देखील शिवसेना पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची बातमी मायमराठी ने प्रसिद्ध केली होती.मात्र विशाल धनवडे यांनी या बातमीचा इन्कार केला होता .पुण्यातून कोणीही फुटणार नाही, बंडखोरांना जाऊन मिळणार नाही असा दावाही त्यांनी केला होता तर शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी सातत्याने मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क ठेवला आहे