दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर रिअल ईस्टेट क्षेत्र तेजीत

Date:

 

 

पुणे. – यावर्षीच्या मार्केटची परिस्थिती पाहता रिअल ईस्टेट क्षेत्रातील मंदीचा काळ संपून तेजी आल्याचे दिसत आहे. ही तेजी आणखी काही दिवस अशीच राहील असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.  दसरा-दिवाळीच्या मुहूर्तापासूनच घर खरेदीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे विकसकांनमध्येही उत्साहाच वातावरण दिसून येतयं. सणासुदीचा हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसकही सरसावले आहेत.

रिअल ईस्टेट क्षेत्रातील तेजीविषयी बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, घरांच्या किमती आता कमी होणार नसून स्थिर राहणार आहेत. ग्राहकालाही याची कल्पना असल्यामुळे ते आता किमती कमी होण्याची वाट न बघता घर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मागील तीन वर्षांपेक्षा या वर्षीचा हा सर्वात चांगला ‘फेस्टीव सीझन’ असेल. परिणामी ग्राहकांच्या चौकशीचे प्रमाणही वाढत आहे. ग्राहक या सणासुदीच्या काळात नक्कीच घर खरेदीचा निर्णय घेतील. सुट्टीच्या दिवशी बांधकाम प्रकल्पाला भेट देण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. गृह प्रदर्शनालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला खात्री आहे की रिअल ईस्टेट मार्केटसाठी या वर्षीच्या सणाचा काळ सर्वोत्कृष्ट असेल.

 

उत्सवाच्या काळात लोकांमध्ये उत्साहांच वातावरण असतं. हा उत्साह त्यांच्या घर खरेदीमध्येही दिसून येतो. या काळात घर खरेदीकरून ते या क्षणाला अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. उत्सवाच्या काळात बांधकाम व्यावसायिक पण नवनवीन योजना आणि सवलती ग्राहकांना देत असतो त्यामुळे खरेदीत तेजी दिसते. परंतु सवलतींवर भाळून न जाता ग्राहकांनी कायदेशीर बाजूही तपासून पहायला हव्यात आणि सर्व पैलु लक्षात घेऊन, प्रकल्पाची चौकशी करून खरेदीचा निर्णय घ्यावा, असे मत गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी व्यक्त केले.

यावर्षीच्या ‘फेस्टीव’ ‘ट्रेन्ड’मध्ये १ व २ बीएचके फ्लॅट सोबतच ३ आणि ४ बीएचके फ्लॅटला ही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. शहराची वाढ बघता उपनगरातही घर खरेदीचे प्रमाण वाढताना दिसतेय. असेही गोयल म्हणाले.

ग्राहकांमधील खरेदीचा उत्साह बघून विकसक जुन्या प्रकल्पांसोबतच नवीन प्रकल्पही ‘लाँच’ करत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसकांनी बँके कडून त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे, पार्किंगसाठी जागा, गृहसजावट यांसारख्या विविध योजनांही आणल्या आहेत. यावर्षीची परिस्थिती पाहता या मुहूर्ताचा फायदा ग्राहकांसोबत विकसकांनाही निश्चित होणार असे दिसून येते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती व खो-खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद

पुणे, दि. ८ मे २०२६: येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले. एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो- १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो- अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण). यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६  विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.  

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई,...

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला...

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च...