पुणे :कसब्याची पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी भाजपचे संकटमोचक अर्थात गिरीश महाजन आज मैदानात उतरले. त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघातील विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना हेमंत रासने तुमच्यासारखाच कार्यकर्ता असल्याने त्याला आपण आमदार करू या..त्याचे हात बळकट म्हणजे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याचे हाथ बळकट होतील असे सांगून मंडळा; मंडळा मध्ये भेद ठेऊ नका,वेळेवर एकमेकांच्या उपयोगी या असा सल्ला हि दिला.
कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासह इतर अनेक जण लढणार असल्यानं भाजपला मोठं आव्हान निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर कसब्याचा गड राखण्यासाठी भाजपच्या पुणे शहराच्या कोअर कमिटीला महाजन यांनी मार्गदर्शन केल्याचे वृत्त आहे.यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती कशी असेल यावरच प्रामुख्यानं चर्चा झाली.आणि प्रत्यक्षात महाजन यांनीही काही जबाबदारी घेऊन कामाला प्रारंभ केला आहे. माजी नगरसेवक दीपक पोटे त्यांच्या समवेत होते.