PM मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून माघार , अजित पवार CM असते तर ही परिस्थिती आली नसती! म्हणत राणा दांपत्यांची माघार

Date:

मुंबई – राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वादातून आता खुद्द रवी राणा यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याने ही माहिती दिली. आमदार रवी राणा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहे.त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही माघार घेत आहोत, कुणाच्या दबावाखाली येऊन नाही, असेही ते म्हणाले.लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. याच अनुषंगाने राणा दाम्पत्याने आपले आंदोलन माघार घेतली असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही चुकीचे वक्तव्य केले नाही. हनुमान चालिसेसाठी आमचा आग्रह होता, मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आम्ही भक्तिभावाने मातोश्रीवर जाणार होतो. मात्र त्यांनी येऊ दिले नाही. शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून दिले ते केवळ मोदींच्या भरवशावर आले आहेत. निवडणुकांच्या काळात बाळासाहेबांचा फोटो छोटा होता आणि पंतप्रधानाचा फोटो मोठा होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसैनिकांनी माझ्याघरावर हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही राणा यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत खासदार राणा म्हणाल्या की, आमच्या अमरावतीच्या घरापर्यंत हे सुरू आहे. शिवसेनेच्या गुंडांना आम्ही घाबरत नाही. घाबरले असतील तर ते मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी गुंड पाठवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाठवलेले गुंड राणांना कधी मारतात याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केला.त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले आहेत आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांचा आडोसा घेतला आहे. आम्ही समजूतदारपणा दाखवून आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी गुंड पाढवून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शिवसैनिकांना आणि गुडांना आम्ही घाबरत नाही. घाबरलो असतो तर मुंबईत आलो नसतो. असे खासदार नवनीत राणांनी म्हटले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री असते, तर ही परिस्थिती ओढवली नसती

नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. अजित पवार जर मुख्यमंत्री असते तर ही परिस्थिती आली नसती. आमच्या अमरावतीच्या घरावर हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना काहीच काम उरले नाही का, असा सवालही त्यांनी केला. गुंडाना उत्तर देण्यासाठी मी इथे आलेले नाही, तर जनसेवेसाठी आले आहे, असेही नवनीत राणांनी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...

”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि क्रीडा...

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...