हक्कासाठी मोठा लढा उभारावा लागेल -सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर

Date:

पुणे- मोदी सरकार रेल्वे कामगारांच्या विरोधी असून रेल्वे कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी या सरकार विरोधात वेळ आली तर मोठा लढा उभारावा लागेल , असे आवाहन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी यांनी केले . घोरपडी येथील डिझेल लोको शेडमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रे रेल्वे कामगारांच्या ते बोलत होते . त्यांनी सांगितले कि , भारताला जोडणारी रेल्वे हि सर्वांची जीवनवाहिनी आहे . परंतु आताच्या सरकार रेल्वे कामगारांच्या मागण्या ऐकायला तयार नाही , केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याना देखील २० नोव्हेंबर २०१५ रोजी आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे . त्यासाठी सरकारशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु , सरकारने अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही .  तसेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर देखील अनेक बैठका झाल्या ,  त्यासाठी रेल्वे कामगारांनी आता संघटित होऊन सरकार विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्यासाठी सज्ज राहावे . सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ११ एप्रिल २०१६ रोजी संपावर जाणार होती , परंतु सरकारने आपल्या मागण्यांच्या न्याय हक्कांचा अभ्यास करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी संघटनेकडे मागितला . त्यामुळे आपला संप स्थगित करण्यात आला . त्यासाठी चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सरकारने नियुक्त करण्यात आलेली समिती काय निर्णय घेते याकडे संघटना पाहत आहे . भविष्यकाळात रेल्वे कामगारांच्या पदन्नतीसाठी आणि वेतन वाढीसाठी सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. स्वतंत्र भारतात रेल्वे कामगार गुलामीचे जीवन जगत आहे , त्यासाठी कामगारांनी आता आपल्या मागण्यासाठी एकजूट झाले पाहिजे .

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री प्रविण वाजपेयी , सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालय उपाध्यक्ष अमित भटनागर , मंडळ अध्यक्ष डी. आर. जमादार , मंडळ सचिव डॉ. एस. पी. सिंग , डिझेल शेड विभागाचे सचिव एच. आर.  इटाले , अध्यक्ष बी. एस. आडेकर , महासचिव नासिरखान शिलेदार , कार्याध्यक्ष याशर खान . युवा अध्यक्ष दिलीप वाघ आदी मान्यवर आणि मोठया संख्येने रेल्वे कामगार वर्ग उपस्थित होता.

यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सर्व पदाधिकारीचे फेटे घालून शाल , श्रीफळ व पुष्प गुछ देउन स्वागत करण्यात आले . सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे घोरपडी ओपन लाईन शाखेच्या कार्यालयाचे उदघाटन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे डिझेल शेड विभागाचे  अध्यक्ष बी. एस. आडेकर यांनी केले तर आभार  सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे  सचिव एच. आर.  इटाले यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...