18 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत निशांत रहाणे, अस्मि आडकर यांना दुहेरी मुकुटाची संधी

Date:

पुणे,  28 एप्रिल 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात निशित रहाणे याने तर, मुलींच्या गटात अस्मि आडकर या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित अग्निमित्रा भट्टाचार्य हिने प्रतिष्ठा सैनीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित अस्मि आडकरने तेलंगणाच्या हिया मेहताचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. 
मुलांच्या गटात सातव्या मानांकित निशीत रहाणे याने अंशुल सातवचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. सहाव्या मानांकित पुण्याच्या तनिष्क जाधव याने आपली अनपेक्षित निकालाची मलिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित साहिल तांबटचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात अस्मि आडकर व प्रिशा शिंदे यांनी धन्वी काळे व अग्निमित्रा भट्टाचार्या या अव्वल मानांकित जोडीचा 6-1, 6-0 असा तर दुसऱ्या मानांकित मृण्मयी जोशी व श्रुती नानजकर या जोडीने रजिथा राजेश व प्रतिष्ठा सैनी यांचा 7-6(0), 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटात जय दिक्षीतने निशित रहाणेच्या साथीत सिद्धार्थ मराठे व अंशुल सातव यांचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:तनिष्क जाधव(महा)[6]वि.वि.साहिल तांबट(महा)[2] 6-2, 6-4;निशीत रहाणे(महा)[7] वि.वि.अंशुल सातव(महा) 6-2, 6-1;
मुली:अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[4]वि.वि.प्रतिष्ठा सैनी(महा) 6-2, 6-3; अस्मि आडकर(महा)[6] वि.वि.हिया मेहता(तेलंगणा) 6-0, 6-0; 

दुहेरी गट: मुले:  जय दिक्षीत/निशित रहाणे वि.वि.सिद्धार्थ मराठे/अंशुल सातव 6-2, 6-4;अर्णव कोकणे/आर्यन कोटस्थाने[3] वि.वि.तनिष्क जाधव/अनमोल नागपुरे[2]6-7(4), 7-6(0), 12-10;
मुली:अस्मि आडकर/प्रिशा शिंदे वि.वि.धन्वी काळे/अग्निमित्रा भट्टाचार्या[1] 6-1, 6-0;मृण्मयी जोशी/श्रुती नानजकर[2]वि.वि.रजिथा राजेश/प्रतिष्ठा सैनी[4]  7-6(0), 7-5.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...