माजी सैनिकांसाठी दक्षिण कमांड येथे माजी सैनिक कक्षाचे (व्हेटरन्स नोड) उद्घाटन

Date:

पुणे, 28 एप्रिल 2022

दक्षिण कमांड मुख्यालयाच्या कॅन्टीन संकुलात एक माजी सैनिक कक्ष (व्हेटरन्स नोड) तयार करण्यात आला आहे. पुण्यातील सेवानिवृत्त सैनिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करता यावे हा या कक्षाचा उद्देश आहे. माजी सैनिकांना विविध सुविधा  सुलभतेने मिळण्यासाठी आणि विविध फायदे आणि हक्कांची माहिती जलदपणे प्राप्त होण्यासाठी  हे अत्याधुनिक संकुल उभारण्यात आले आहे. याद्वारे माजी सैनिकांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी दक्षिण कमांड आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करते.

दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जेएस नैन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, जीओसी-इन-सी आणि पुण्यातील सेवानिवृत्त सैनिकांच्या उपस्थितीत 28 एप्रिल 2022 रोजी पुण्यातील सर्वात ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल बीटी पंडित, पीव्हीएसएम, व्हीआरसी (निवृत्त) यांच्या हस्ते दक्षिण कमांडच्या सेवानिवृत्त सैनिक कक्ष संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. माजी  सैनिकांसाठी सुरू असलेल्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल सेवानिवृत्त सैनिकांनी लष्कर कमांडर आणि दक्षिण कमांड मुख्यालयाप्रती  आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर; १६ एप्रिलचे विधेयक देश तोडणारे: नाना पटोले

भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; मुंबई, दि. २४ एप्रिल २०२६. भारतीय जनता...

भाजप म्हणजे ‘बकासुराचा’ पक्ष!:न्याय हवा असेल तर ‘बागेश्वर बाबां’कडे जायचे का?

मुंबई-भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना...