दिल्ली, २२ मार्च २०२२: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (महिंद्रा फायनान्स/एमएमएफएसएल) चा वाहन भाडेकरार आणि सदस्यता (सबस्क्रिप्शन) व्यवसाय असलेल्या क्विकलीझ (Quiklyz) ने ब्लूस्मार्ट मोबिलिटी या भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या शून्य-उत्सर्जन परिवहन पुरस्कर्त्या (राइड-हेलिंग) सेवा आणि व्यासपीठ कंपनी सोबत करार करण्यात आल्याची आज घोषणा केली. या कराराचा एक भाग म्हणून, क्विकलीझ (Quiklyz) सुमारे ५०० इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVS) विवक्षित भाडेकरार उपलब्ध करून देणार आहे. ही वाहने ब्लूस्मार्टच्या १००% इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यामध्ये तैनात केली जाणार आहेत.
ही वाहने दिल्ली एनसीआर विभागात तैनात केली जाणार असून ब्लूस्मार्ट अॅपद्वारे सध्या एनसीआरमध्ये सुरू असलेल्या सर्व ब्लूस्मार्ट इलेक्ट्रिक परिवहन (राइड हेलिंग) सेवांसाठी उपयोगात आणली जातील.
क्विकलीझ (Quiklyz) हे नव्या युगाचे वाहन भाडेकरार आणि सदस्यता व्यासपीठ आहे, ज्यामध्ये भारतातील सर्व आघाडीच्या ओईएम मधील प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी विविध ग्राहक विभागांमध्ये विस्तृत उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात.
‘ब्लूस्मार्ट’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सिंग जग्गी म्हणाले, “ब्लूस्मार्ट आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याच्या माध्यमातून गतिशीलतेला चालना देते, तसेच अधिक स्मार्ट आणि शाश्वत परिवहनासाठी शून्य-राइड नकार, शून्य-सर्ज आणि शून्य-टेलपाइप उत्सर्जन यांच्यावर आधारित उत्तम आश्वासक परिवहन (राइड-हेलिंग) सेवा प्रदान करते. आम्हाला अशा एका भागीदाराची गरज होती, जो योग्य वित्तपुरवठा संरचना तसेच उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम सेवा स्तर उपलब्ध करून देऊ शकेल आणि आनंदाची बाब म्हणजे क्विकलीझ (Quiklyz) च्या रूपाने आम्हाला या सर्व आवश्यकता पूर्ण करणारा आदर्श भाडेकरार भागीदार सापडलेला आहे. त्याच्या योगे आम्ही आता क्विकलीझ (Quiklyz) सोबत एका अशा दीर्घकालीन भागीदारीची अपेक्षा करतो, जी सर्वांसाठीच पूर्णत: लाभदायक ठरणारी असेल.”
क्विकलीझ (Quiklyz) चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख मोहम्मद तुर्रा यांनी नमूद केले, की “भारतातील इलेक्ट्रिक वाहनांना लोकप्रिय करण्यासाठी सहाय्यभूत ठरतील अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण भाडेतत्त्वावरील उपाययोजना पुरविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याच एक उल्लेखनीय पोर्टफोलिओ तयार करणाऱ्या ब्लूस्मार्टसाठी त्यांच्या पसंतीचे लीजिंग भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. भविष्यात देखील आवश्यक परिवतर्न घडवून आणण्यासाठी ईव्ही विभागांमध्ये आवश्यक असलेली सर्व प्रकारची लीजिंग उत्पादने तयार करणे आणि उपलब्ध करून देणे आम्ही सुरूच ठेवणार आहोत.”
ब्लूस्मार्ट सध्या दिल्ली एनसीआर प्रदेशात कार्यरत असून कंपनीने भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे. ब्लूस्मार्टतर्फे एक भव्य असे ईव्ही चार्जिंग सुपरहब देखील चालवले जाते, ज्याच्या माध्यमातून ब्लूस्मार्ट स्वतःच्या ईव्ही वाहनांच्या ताफ्याला उर्जा शक्ती देते तसेच इतरांना देखील ही सेवा प्रदान केली जाते.
क्विकलीझ (Quiklyz) कडे सध्या भाडेकरार आणि सदस्यत्व (लीजिंग आणि सबस्क्रिप्शन) प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक वाहनांचा (EVS) सर्वात मोठा पोर्टफोलिओ उपलब्ध आहे. महिंद्रा, टाटा मोटर्स, पियाजिओ, मर्सिडीज-बेंझ इत्यादीसह सर्व प्रमुख ओईएम (OEMS)मध्ये इलेक्ट्रिक 4W तसेच इलेक्ट्रिक 3W दोन्ही प्रकार कंपनीतर्फे पुरविले जातात. क्विकलीझ (Quiklyz) च्या ग्राहकांसाठी देण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित सुविधांमध्ये शून्य डाउन पेमेंट योजना, लवचिक कार्यकाळ पर्याय, पुनर्विक्री किंवा देखभालीचा त्रास नाही या सुविधांच्या जोडीला आणखी बरेच काही समाविष्ट आहे.