पुणे-वाकड कल्चरल फॉरम तर्फे वाद्यवादन मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले ..यामध्ये पुण्यातील आघाडीच्या २ युवा कलाकारांचे वादन झाले . बासरीवादक रोहित वनकर आणि सरोद वादक नितीश पुरोहित यांची मैफल अतिशय रंगतदार झाली .
राग चारुकेशी मधील एकाल वादनाने मैफलीस प्रारंभ झाला . त्यानंतर अहिर भैरव रागात मध्य तीन तालात रोहित
वनकर यांनी बासरी वादन सादर केले .
त्यानंतर सरोद वादक नितीश पुरोहित यांनी बिलासखानी तोडी राग सरोदवर पेश करून रसिकांची वाहवा मिळविली .
तसेच राग भीमपलास मध्ये द्रुत तीनतालात एक रचना सादर करून त्यानुसार त्या रागातील चुपके चुपके रात दिन , तू
चीज बडी है मस्त मस्त ,नैनोमें बदरा छाये , घेई छंद मकरंद अश्या गीतांची मेडली दोन्ही वाद्यांवर सादर झाली.
त्यानंतर सरोद वरमधील राग मेघ मल्हारमध्ये धमार सादर केले . तसेच त्यानंतर मिया मल्हारमधील रचना सादर
करून नितीश यांनी रसिकांना जागीच खिळवून ठेवले .
त्यानंतर रोहित वनकर यांनी राग पहाडी धून बासरीवर वाजवून रसिकांना आनंद दिला . त्यानंतर खमाज आणि गारा
आयो कहासे घनश्याम ही रचना सादर झाली . आणि मैफलीची सांगता भैरवीतील बासरी सरोद अशा जुगलबंदीने झाली
. तबल्याची साथ अमोल माळी आणि रोहन चिंचोरे यांनी केली .या मैफलीचे सुत्रसंचालन श्रुती आपटे यांनी केले . मीनल
राणे यांनी मैफलीचे आयोजन केले .ध्वनी व्यवस्था अतुल पंढरपुरे यांची होती .
वाद्यवादन मैफलीने भरला रंग …
Date: