पुणे-भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.२८ सॅलेसबरी पार्क-महर्षी नगरप्रभागमधील मातोश्री गयाबाई भानुदास वैरागे गार्डन येथे ओपन जिमचे उदघाटन नगरसेविका कविता वैरागे यांच्याहस्ते करण्याचे आले व दहावी बारावीमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप नगरसेविका कविता वैरागे व माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे यांच्याहस्ते करण्यात आले . तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला . यावेळी लहान मुंलाना खेळण्यासाठी बाळमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाळमेळाव्यामध्ये लहान मुलांनी सहभागी होऊन आनंद लुटला .व नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे शहरध्यक्ष माजी नगरसेवक डॅा भरत वैरागे, नगरसेविका राजश्री शिळिमकर,नगरसेविका सायली वांजळे, भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष हरिष परदेशी , अविनाश शिळिमकर, किरण रामसिना, प्रसन्नजीत वैरागे, दिलिप घोक्षे, संजय भिसे, सागर घोक्षे, सरदेशपांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते .