Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवाजीनगर मतदारसंघातील ७०० गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी

Date:

पुणे – गर्भवती महिलांची आज सुदृढ आरोग्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. राज्य शासनानेही अशा महिलांसाठी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधित लाभार्थी महिलांपर्यंत पोचवण्यासाठी मतदारसंघातील झोपडपट्टी व वस्ती विभागातील गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. मतदारसंघातील दवाखान्यांमध्ये झालेल्या या शिबिरात सुमारे ७०० महिलांची तपासणी करण्यात आली.

महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल, संजय गांधी हॉस्पिटल, शेवाळे हॉस्पिटल, औंध रूग्णालय, वडारवाडीतील डॉ. होमी भाभा हॉस्पिटल, येरवड्यातील राजीव गांधी रूग्णालय आणि खडकी कॅन्टोन्मेंटच्या रूग्णालयात या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात गर्भवती महिलांची आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, रक्त, लघवी, हिमग्राम अशा आवश्यकत्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. शिबिरासाठी महापालिकेच्या डॉक्टरांच्या शिवाय डॉ. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे तज्ञ डॉक्टरांनाही खास आमंत्रित करण्यात आले होते.

सर्व रूग्णालयात जाऊन आमदार विजय काळे यांनी महिलांची भेट घेऊन संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांचे आरोग्य चांगले व सुदृढ असावे यासाठी गर्भवती महिलांनाच उपचार आणि पौषक आहारासाठी पाच हजार रूपये देण्याची प्रंतप्रधान मातृ वंदन योजना गेल्याच वर्षीपासून सुरू केली आहे. या योजनेत महापालिकेच्या किंवा सरकारी रूग्णालयात प्रसूतीसाठी नाव नोंदवणा-या किंवा किमान एकदा तरी तपासणी करून घेतलेल्या गर्भवती महिलांसाठी आहे. अशा गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रूपयांची मदत देऊ केली आहे. ही मदत थेट त्यांच्या बँकेतील खात्यावर तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी बँक खाते फक्त संबंधित महिलेच्या नावावर असणे आणि त्यांचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. या शिवाय एखाद्या महिलेला जास्त उपचारांची गरज लागल्यास ते सुद्ध करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात दळवी रूग्णालयातील शिबिरार्थींची चहा, नाष्ट्याची व्यवस्था स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे यांनी केली होत. संजय गांधी, औंध आणि शेवाळे रूगणालयातील व्यवस्था नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे आणि सुनिता वाडेकर तर खडकीतील व्यवस्था उपाध्यक्ष अभिजीत सावंत ,सुरेश कांबळे आणि त्यांच्या सहकार-यांनी बघितली. या सर्व रूग्णालयांमध्य महापालिकेच्या डॉक्टरांबरोबरच दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचेही प्रसूती तज्ञ डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित होते. महापालिकचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे यांनी या सर्व शिबिरांचे समन्वयन केले होते. या पूर्वी मतदारसंघातील ६००० महिलांची मोफत आरोग्य तपासणी व गरजेनुसार मोफत उपचार करण्यात आले होते.

फोटओळ – दळवी रूग्णालयासह सहा रूग्णलयांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघातील गर्भवती महिलांच्या मोफत आरोग्य तसापणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दळवी रूग्णालयातील शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे, डॉ. संतोष मुळे आणि तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...