पुणे: प्रगत भविष्याच्या संधी सर्वांना एकसमान उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुर्वांकरा लिमिटेडने प्रोटियन इजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा (आधीची एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) ऑनलाईन शिष्यवृत्ती प्लॅटफॉर्म विद्यासारथीसोबत भागीदारी केली आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील ९ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २४ विद्यार्थ्यांना पुर्वांकरा शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना साहाय्य पुरवण्याचे पुर्वांकराचे उद्दिष्ट आहे.
शैक्षणिक कामगिरीबरोबरीनेच पात्रता निकषांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. एकच पालक असलेल्या किंवा ज्यांचे कुटुंब कोविड-१९ ने प्रभावित झाले आहे अशा विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. एकूण १० लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती रकमेचे वाटप करण्यात आले असून, असे वाटप दरवर्षी केले जाईल.
शिष्यवृत्ती योजनेबद्दल पुर्वांकरा ग्रुपच्या कार्यकारी संचालिका श्रीमती अमांडा पुर्वांकरा म्हणाल्या, “सर्वांना शिक्षण मिळावे, खासकरून आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करवून दिल्या जाव्यात यासाठी आम्ही दीर्घ काळापासून वचनबद्ध आहोत. आमचे असे ठाम मत आहे की, पुर्वांकरा शिष्यवृत्तीमार्फत आम्ही या विद्यार्थ्यांची रोजगार सक्षमता वाढवत आहोत आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करत आहोत. प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सहयोगाने हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवून शिक्षणाच्या सार्थक संधी निर्माण करणे आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (एसटीईएम) शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सर्वसामावेशी भवितव्य निर्माण करण्याचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अशाप्रकारच्या प्रतिष्ठित संघटनांसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. लवकरच ही योजना आम्ही चेन्नईमध्ये देखील उपलब्ध करवून देऊ.”
भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचे अर्थसहाय्य अधिक सहजपणे, विनाअडथळा उपलब्ध व्हावे यासाठी प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ‘विद्यासारथी’ हा तंत्रज्ञान-चालित प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. संपूर्ण शिष्यवृत्ती योजनेचे व्यवस्थापन यामध्ये केले जाते, यामध्ये अर्ज प्रमाणित करणे, शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि फंड्सचे वाटप करणे यांचा समावेश असतो.
प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. गोपा कुमार टी एन म्हणाले, “पुर्वांकरा लिमिटेडसोबत भागीदारी करून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतभरातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य सहज उपलब्ध करवून द्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी व ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हे आमचे उद्दिष्ट आहे. पुर्वांकरासोबत आमच्या भागीदारीमुळे या पात्र विद्यार्थ्यांना एक महान भवितव्य प्रत्यक्षात निर्माण करता येईल.”
२०२० साली प्रोविडेंट हाऊसिंग या पुर्वांकराच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सहयोगाने गोव्यामध्ये प्रोविडेंट हाऊसिंग शिष्यवृत्ती सुरु केली होती आणि गेल्या दोन वर्षात ६४ विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीचे लाभ मिळाले आहेत.