जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. नुकतीच ही एके दिवशीय कार्यशाळा नेहरू मेमोरिअल हॉल येथे पार पडली. ‘क्यूब नाईन’ व एच.आर झूम फिल्मस् यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. अभिनय कला कशी जोपासावी, अभिनयाचे विविध पैलू, अभिनयाबाबत विविध गोष्टींचे मार्गदर्शन यासंदर्भात जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून अभिनय क्षेत्रात कारकीर्द करणाऱ्यांना करण्यात आले. या एके दिवशीय कार्यशाळेद्वारे नवोदितांनी अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तसेच त्यांच्या शंकांचे निरसन गोखले यांनी केले.
या कार्यक्रमाला मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालक संजय ठुबे, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे ‘क्यूब नाईन’ संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी गोखले म्हणाले, नव्या उमेदीच्या कलाकरांची चित्रपटसृष्टीला सध्या गरज आहे. सध्या मी अनेक नवीन कलाकारांसोबत काम करत आहे. सध्याच्या पिढीतील कलाकरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे. मात्र त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन होत नाही. त्यांनी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अभिनय करताना चेहऱ्यावरील हावभाव, भाषेवर प्रभूत्व, वाचन, लिखाण अशा अनेक बाबी नवोदितांना कळल्या पाहिजेत. अभिनय कला ही एक मोठी साधना आहे. ती जोपासली पाहिजे. त्या शिवाय नट हा अभिनयातील ‘नटसम्राट’ होत नाही.
‘क्यूब नाईन’चे संचालक तेजस भालेराव म्हणाले, सध्या आम्ही तीन देशात व्ही.एफ. एक्स मध्ये कार्यरत आहोत. भारत, चीन व दुबई या ठिकाणी आमची कार्यलये आहेत. आम्हाला अभिनय क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणीईला गोखले यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.
एच. आर झूम फिम्लसचे राजाराम कोरे म्हणाले, अभिनय क्षेत्रात हे खूप मोठे क्षेत्र असून यात करिअर करायचे असेलतर मार्गदर्शनाशिवाय या क्षेत्रात येणे धोक्याचे आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. ते पण योग्य व्यक्तींकडून त्यासाठी अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या सोबत आम्ही सशुल्क सहामाही अभिनय कार्यशाळेचे आयोजन लवकरच करणार आहोत. यात स्वत: विक्रम गोखले मार्गदर्शन करतील. अभिनयक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या कलाकारांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांनी केले.