Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खंडाळा घाटात लोहमार्गावर कोसळली दरड…..

Date:

पुणे-: पुणे-मुंबई लोहमार्गावर रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील मंक्की हिलजवळ अप व मिडल या दोन्ही मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यानं शनिवारी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप लाईनवरील दरड हटवून हा मार्ग सुरु करण्यात आला असला तरीही मिडल लाईन ही बंदच आहे. या मार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरु असून मिडल लाईन सुरु होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.
मंक्की हिलजवळ दरड कोसळल्याने कोल्हापूर-अहमदाबाद ही गाडी खंडाळा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली तर सोलापूरला जाणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सीएसटीलाच थांबविण्यात आली होती. यासह रात्रीच्या वेळेला धावणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावल्या. लोणावळा व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने डोंगरभागातील दगड मार्गावर येऊ लागले आहे

शनिवारी रात्री कोसळलेली दरड ही अप व मिडल या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा झाला होता. ही दरड पडल्याची माहिती समजल्यानंतर तातडीने लोणावळा व कल्याण येथील आपत्कालीन यंत्रणा घटास्थळी दाखल झाली, त्यांनी मोठे दगड हटवण्याचे काम सुरू करत अप लाईन मध्यरात्री सुरू केल्याने उशिराने का होईन रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू झाली. मिडल लाईनवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु असल्याने ती रात्रभर बंद होती. सकाळी देखील याठिकाणी काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर मिडल लाईन सुरु करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...