मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Date:

पुणे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन मंगळवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चा आणि किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक कुंजीर यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली होती. जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंढवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अखिल भारतीय मराठा महासंघातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. पुणे जिल्हा सरचिटणीस पदी असताना त्यांनी अनेक आंदोलने मोर्चांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. यानंतर त्यांनी मराठा सेवा संघ आणि बामसेफ अशा संस्थांसोबत काम केले. मग काही दिवसांनी संभाजी ब्रिगेडची जबाबदारी पार पाडली. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक झाली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील शेतकरी आंदोलनांमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परस्परविरोधी लोकांशीही त्यांनी समन्वय साधत यशस्वी आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...