पुणे महानगरपालिका, साखर कारखान्यांकडे जलसंपदाची कोट्यवधींची थकबाकी.

Date:

पुणे : सिंचन आणि बिगर सिंचन पाणी वापरापोटी पुणे महानगरपालिका आणि जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांकडे जलसंपदा विभागाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली असून तातडीने ही थकबाकी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जलसंपदा विभागाच्या खडकवासला आणि नीरा प्रणाली या विभागांची कोट्यवधी रुपयांची बिगर सिंचनाची थकबाकी थकवली आहे. कारखान्यांच्या व्यवस्थापनास वारंवार थकबाकी भरण्याबाबत सूचना देऊनही अद्याप ही थकबाकी भरण्यात आलेली नाही. जलसंपदा विभागाकडून खडकवासला आणि नीरा प्रणालीच्या माध्यमातून पंधराहून अधिक कारखान्यांना वापरासाठी (बिगर सिंचन) पाणी देण्यात येते. मात्र, या कारखान्यांनी गेल्या काही वर्षांपासूनची पाणीपट्टी थकवली आहे. अनेकवेळा नोटिसा बजावूनही पाणीपुरवठा बंद होऊ नये, म्हणून तोकडी रक्कम भरण्याकडे कारखान्यांचा कल असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी मार्चअखेर यशवंत सहकारी साखर कारखान्याकडे २०.४६ कोटी, संत तुकाराम कारखान्याकडे ९.७८ कोटी, कर्मयोगी कारखाना २.८४ कोटी, भीमा पाटस कारखाना १४८.८७ कोटी, दौंड शुगर ७५.६१ कोटी, बारामती अ‍ॅग्रो ३.६८ कोटी, अनुराज शुगर्स ३७.४९, व्यंकटेश शुगर १.३२, श्रीनाथ म्हस्कोबा ३६.८३, श्रीगोंदा कारखाना १०.९४, घोडगंगा कारखाना १७.५९ अशी मिळून एकू ण ३६५.४१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महापालिकेकडे २८६.१९ कोटींची थकबाकी

पुणे महापालिके कडे नियमित पाणीपट्टी ५९ कोटी, औद्योगिक पाणी वापरापोटी १५२.१० कोटी अशी एकू ण २११.१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच जुना मुठा कालवा जागेचा प्रलंबित भाडेपट्टा ०.८५ कोटी, जलवाहिनी भाटेपट्टा ७३.७७ कोटी, नवीन मुठा उजवा कालवा आणि जलवाहिनीचा भाडेपट्टा अशी ७५.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही दोन्ही मिळून एकू ण महापालिके कडे २८६.१९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दोन उन्हाळी आवर्तने

शेतीसाठी रब्बी हंगामात ३३ दिवसांमध्ये २.७३ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी सोडल्यानंतर उन्हाळ्यात दोन आवर्तने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिले आवर्तन २२ फे ब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत घेतले जाणार असून या काळात ४.४० टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे. त्यानंतर दुसरे आवर्तन घेतले जाणार आहे. याबाबतची माहिती जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार बैठकीत सादरीकरणावेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

६०० कोटी जास्त दर दिलेल्या अशोक लेलॅंडला PMPML च्या 1 हजार बसची ऑर्डर ?

पुणे- सध्या PMPML विविध मार्गाने प्रसिद्धी झोतात आहे. बेकायदा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासन आग्रही

भूखंडाचा वाणिज्य झोन PSP करण्यासाठी राज्य सरकार कडे...