पुणे— पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना आज गुरूवार दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी
10.30 वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे एनडीएचे कमांडंट एअर मार्शल आय.पी. विपीन
(व्हीएम) व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. याप्रसंगी पीएमआरडीएचे मेट्रो
पॉलिटीयन कमिशनर व सीईओ किरण गिते (आयएएस) व त्यांच्या पत्नी, अभिनेत्री प्राजक्ता
माळी, मिसेस युनायटेड नेशन्स श्रद्धा कक्कड व अभिनेत्री आयली घिया हे उपस्थित होते. पुणे
फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल
यांसबरोबर नगरसेवक प्रसन्न जगताप, रविंद्र दुर्वे, राजू साठे, अतुल गोंजारी, बाळासाहेब आमराळे,
दत्तात्रय कोळेकर, अशोक मेमजादे, वसंत भाटिया, सुप्रिया ताम्हाणे, तेजश्री अडिगे, संयोगिता कुदळे,
रमेश भांड, रवि चौधरी, गणेश खुडे, सुहास रानवडे, विनेश परदेशी, अमोल बोरसे, श्रुती तिवारी,
तन्मयी मेहेंदळे, विजय शेटे, सचिन सावंत, सुरेश उकिरंडे आदी यावेळी उपस्थित होते. वेदमूर्ती
धनंजय घाटे गुरूजी यांनी याचे पौराहित्य केले. पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल
सारस येथील हॉलमध्ये करण्यात आली आहे. तेथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.