पुणे- मोठ्या भक्तिमय आणि मांगल्याच्या वातावरनात आज पुण्यनगरीत गणपती बाप्पांचे आगमन झाले यावेळी तब्बल १०० नगरसेवक दिलेल्या पुणेकरांच्या वतीने महापौर गणेशाच्या स्वागताला शहरात उपस्थित नसल्याने अखेर विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे हडपसरच्या चेतन तुपे पाटलांनी गणेशाचे मोठ्या थाटामाटात आणि दिमाखदार पद्धतीने स्वागत केले .. त्यांनी यावेळी ..गेल्या वर्षी खंडित झालेला .. परंपरेला पुन्हा सन्मान देण्याचा प्रयत्न करत भाऊ रंगारी गणेश उत्सव मिरवणुकीचे सारथ्य केले तर अखिल मंडई मंडळाच्या गणेश रथाचे सारथ्य करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची हि आराधना केली .भाजप सत्तेवर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पाटलांना हा सन्मान लाभल्याने त्यांच्या चाहत्यांच्या वर्तुळातील अनेकांनी समाधान व्यक्त केले .