पुणे लष्कर भागात ताबूत स्ट्रीटवरील मेहेर मोहल्ला येथील घर क्रमांक ७६२ वरील ब्रिटिशकालीन इमारत मुसळधार पावसामुळे आज दुपारी बाराच्या सुमारास कोसळली . गेले अनेक दिवसापासून पाऊसाची सततधार असल्यामुळे हि इमारत कोसळली .या इमारतीच्या बाजूने एक जेष्ठ महिला चालत असताना तिनें पळ काढल्यामुळे ती महिला वाचली . लष्कर भागात अनेक धोकादायक इमारती असून इमारती घरे कोसळण्याच्या घटना या घडत असतात . परंतु याकडे पुणे कॅण्टोन्मेट बोर्ड दुर्लक्ष करते . अशी तक्रार या भागातील रहिवाश्यानी केली . या इमारतींबाबत पुणे कॅण्टोन्मेट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी २३ जुलै २०११ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता . परंतु पुणे कॅण्टोन्मेट बोर्डाने या इमारतीवर फक्त नोटीस चिटकविण्याचे काम केले . अशी माहिती येथील रहिवाशी बर्थो रोझरिओ यांनी दिली . घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांना घराबाहेर काढले . त्यामुळे मोठी जीवितहानी टळली . या इमारतीच्या शेजारील घर क्रमांक ७६३ वरील इमारतीला तडे गेले आहेत . त्यामुळे येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिक बर्थो रोझरिओ या धोकादायक अवस्थेत राहत आहे .
या भागात अनेक जेष्ठ नागरिक राहत आहेत , त्यामध्ये या कोसळलेल्या इमारतीचा राडारोडा शेजारील ख्रिश्चन कॉलनीमध्ये पडला आहे . या कॉलनीमधील स्वछतागृहावर हा राडारोडा पडला . त्यामुळे येथील जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . अशी तक्रार जेष्ठ नागरिक अंजनीस रेफीअल यांनी दिली . दुपारी बारा वाजत हि इमारत कोसळली असताना पुणे कॅण्टोन्मेट बोर्डाचा अग्निशामक दल घटनास्थळी दुपारी तीनच्या सुमारास पोहचले .
एखादी मोठी इमारत कोसळल्यानंतर जीवितहानी झाल्यानंतर पुणे कॅण्टोन्मेट बोर्ड जागे होणार आहे का ? लष्कर भागात अनेक जेष्ठ नागरिक धोकादायक इमारतीमध्ये राहत आहे .पुणे कॅण्टोन्मेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेले अनेक दिवसापासून रजेवर गेल्यामुळे आमची दखल घ्यायला कोणी वालीच उरलेला नाही . त्यामुळे महाडसारख्या दुर्घटनेनंतर आमची दखल घेणार का ? असा सवाल पुणे लष्कर भागातील रहिवाश्यानी व्यक्त केला .