पुणे-खाजगी वाहनांची वर्षानुवर्षे गळचेपी करीत भर गर्दीत स्वतः मात्र निवांत मोकळ्या पहुडलेल्या बाप बीआरटी मार्गावर एका ट्रक ने पहा अशी चढाई केली ….
सोलापूर महामार्गावर भैरोबानाला येथे गणेश मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी बी आर टी साठी केलेल्या दुभाजकावर मालट्रक चढला . या दुभाजकांवर लाल चमकणारी पट्टी नाहीच त्यामुळे हा मालट्रक अपघाताने बी आर टी दुभाजकावर चढला . हा मालट्रक सुमारे या दुभाजकावरून बरेच अंतर घासत गेला . या मार्गावरील दुभाजकावर वाहनाचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .खरे तर हा उखडून सर्व वाहनांना समान न्याय तत्वाने रस्ता खुला केला पाहिजे .पण इथल्या दुभाजकांना लाल चमकणारे पट्टे,दिवे लावून तरी वाहनांना समजेल अशी व्यवस्था करायला हवी पण … खाजगी वाहनांची काळजी घेणारे पुण्यात जन्माला यायचेत …. तो पर्यंत असेच चालणार ..हा मालट्रक दुपारी एकच्या सुमारास या महामार्गावरील सर्व वाहतूक थांबवून क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक पोलिसानी हा मालट्रक बाजूला करण्यासाठी परिश्रम घेतले . यावेळी सर्व वाहतूक थांबवल्याने या भागात वाहतूक कोंडीचा सामना अनेक वाहन चालकांना करावा लागला . दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली .