पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र दौंडकर

Date:

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र दौंडकर यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये 3 हजार 655 मते घेऊन दौंडकर यांनी एकतर्फी विजय मिळविला.

उपाध्यक्षपदी हेमंत झंजाड आणि संतोष जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना अनुक्रमे 3 हजार 191 आणि 2 हजार 149 मते मिळाली. सचिवपदी विवेक भरगुडे 2 हजार 637 आणि अशिष ताम्हाणे 1 हजार 653 मते मिळवून विजयी झाले. खजिनदारपदी दत्तात्रय गायकवाड यांची निवड झाली असून, त्यांना 1 हजार 363 मते मिळाली. हिशेब तपासणीस पदी कुमार पायगुडे यांची निवड झाली असून, त्यांना 2 हजार 979 मते मिळाली. कार्यकारिणी सदस्यपदी ओंकार चव्हाण, योगिनी गायकवाड, ज्योती जाधव, श्रीकांत काळभोर, स्वप्नील काळे, अमित खोत, सुनील क्षीरसागर, संतोष मोटे, अनुप पाटील, अभिजित पोळ या दहा जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे बार असोसिएशनच्या 2017-18 च्या वार्षिक निवडणूकीसाठी आज सकाळी 9.30 वाजता मतदानास सुरूवात झाली. सायंकाळी 5.30 सुमारे 5 हजार 157 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पोलीस निरीक्षक नितीन कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव आणि सहाय्यक पोलीस फौजदार प्रताप बिरंजे यांनी लावलेल्या चोख बंदोबस्तामुळे निवडणूक सुरळीतपणे पार पडली. सलग तिसऱ्या वर्षी बारच्या निवडणूकीसाठी इलेक्‍ट्रॉनिक व्होटींग मशिनचा वापर करण्यात आला. जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल, जेन्टस्‌ बार रुम आणि नवीन इमारतीसमोरील अशा तीन निवडणूक केंद्रात 24 इलेक्‍ट्रॉनिक मशिनमध्ये मतदान

घेण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एकनाथ सुगावकर यांनी काम पाहिले. प्रवीण नलावडे, संजय दळवी, शिरीष शिंदे यांनी सह-निवडणूक अधिकारी म्हणून, तर अमरसिंह पाटील, यशवंत खराडे, ज्ञानेश्‍वर बर्डे, स्मिता देशमुख आणि माधवी परदेशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...