पुणे-क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य आणि सर्वसमावेशक फॅंटसी स्पोर्टस व्यासपीठ असा लौकिक असलेले “ऑनलाइन स्टारपिक” आता भारतात दाखल झाले आहे. उल्फ एकबर्ग, त्रिगम मुखर्जी आणि रोहित नायर या त्रयीद्वारे स्थापन करण्यात आलेल्या ‘स्टारपिक’चे सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जॉण्टी ह्रोडस आणि नामवंत क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहणार आहेत. कंपनी अकराव्या आयपीएल सिझनसाठी देखील सज्ज झाली असून, त्यादरम्यान १० कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्टारपिकतर्फे जगभरात सगळीकडे विविध क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, युरोपीयन फूटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, फॉर्म्युला वन, गोल्फ, बायसिकल रेसिंग इत्यादीचा समावेश आहे. त्याच्या जोडीला जागतिक ख्यातीचे तज्ञ आणि विश्लेषक याच्याशी संलग्न असल्यामुळे स्टारपिक हे देशातील सर्वात मोठे, अग्रगण्य आणि सर्वसमावेशक क्रीडा मनोरंजन व्यासपीठ बनले आहे. कंपनीच्या स्वीडन येथील तंत्रज्ञान टीमने कंपनीला आणि तिच्या उत्पादनांना अव्वल दर्जाचे बनवले आहे. क्रिकेटजगतातील आघाडीचे खेळाडू हरभजनसिंग, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि गौतम गंभीर यांची ‘स्टारपिक’चे ब्रांड अँबॅसेडर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.