पंधरवड्यात 45 हजार वीजजोडण्या खंडित

Date:

पुणे : वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 45 हजार 79 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 18 कोटी 73 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी गेल्या पंधरवड्यात खंडित करण्यात आला.

गुरुवारी (दि. 29) व शुक्रवारी (दि. 30) सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकीचा भरणा करता यावा यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेली ही मोहीम सुटीच्या दिवशी सुद्धा सुरु राहणार आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे व मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

गेल्या पंधरवड्यात पुणे शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 28 हजार 620 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 8 कोटी 13 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील 8520 वीजग्राहकांकडे 5 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 7939 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 5 कोटी 34 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीमुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्शन चार्जेस) भरणे नियमानुसार आवश्यक असून त्यानंतरच संबंधीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. नियमानुसार लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 50 रुपये तर थ्री फेज कनेक्शनसाठी 100 रुपये तर उच्चदाब वीजग्राहकांसाठी 500 रुपये पुनर्जोडणी शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सोय उपलब्ध नसल्याने थकबाकीदारांनी थकीत रक्कम व पुनर्जोडणी शुल्क कार्यालयीन वेळेत भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कटू कारवाई टाळा, सहकार्य करा – वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र दि. 29 व 30 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.