ई – वेस्ट कलेक्शनसाठी ‘आनंद कॉम्प्युटर्स’ ला स्पेशल ज्युरी अॅवार्ड
पुणे :
इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे ‘ई – वेस्ट कलेक्शन’ च्या प्रसारासाठी काम केल्याबद्दल ‘आनंद कॉम्प्युटर्स’ ला स्पेशल ज्युरी अॅवार्ड देण्यात आले.
‘कॉम्प्युटर्स अॅण्ड मीडिया डीलर्स असोसिएशन’ (सीएमडीए) आयोजित आय.टी.एक्स्पो प्रदर्शनात ‘आनंद कॉम्पुटर्स’ ने ‘ई वेस्ट कलेक्शन सेंटर’ आणि स्टॉलद्वारे जनजागृती केल्याबद्दल हे पारितोषिक देण्यात आले.
सीएमडीएचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आनंद कॉम्प्युटर्सचे संचालक संजय भंडारी यांना हे पारितोषिक प्रदान केले. यावेळी सौ. भंडारी उपस्थित होत्या.