महाराष्ट्र गांधी स्मारक निधी(गांधी भवन,युवक क्रांती दल,रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी (औंध) आणि मशाल या संस्थांतर्फे कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या गरजूंपर्यंत जीवनोपयोगी साहित्य आणि किराणा सामानाची मदत पोहोचविण्यात आली.या मदतकार्यात सोमवार आणि मंगळवारी आंबेगाव(जिल्हा पुणे) च्या दुर्गम भागातील १५० आदिवासींना,पुण्यातील ३० तृतीयपंथिना तसेच पुण्यातील गरजूंना किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
मागील २० दिवसात पुण्यातील सुमारे १५०० गरजूंपर्यंत सुमारे साडे चार लाख खर्चून हे मदतकार्य करण्यात आले. अनेक संस्था आणि नागरिकांनी आर्थिक मदत करून उभारलेल्या निधीतून हे मदत कार्य करण्यात आले. ३०० रूपयात एका व्यक्तीला आठवडाभर पुरेल एवढे किराणा सामान देता येते,अशा अंदाजावर आधारित ३०० रुपये देणगी देण्याचे आवाहन सोशल मीडिया वरून करण्यात आले होते. कात्रज,पानमळा,कोंढवा,मुंढवा,भवानी पेठ ,न्यु कोपरे,वारजे माळवाडी,सदाशिव पेठ,काळेपडळ,दापोडी,येरवडा,गणपतीमाथा,एरंडवणे,पिंपरी चिंचवड ,मोमीनपूरा,वडगाव,सुखसागरनगर ,
न-हे ,सुसगाव,धायरी,फुरसूंगी,आंबेगाव(जिल्हा -पुणे) या ठिकाणी हे मदतकार्य करण्यात आले.
डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,सचिन चौहान,
‘मशाल’ संस्थाचे पदाधिकारी शरद महाजन,रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी औंधचे अध्यक्ष विनोद पाटील, संदेश सावंत,सेम्युअल केनडी तसेच मुख्तार मणियार,सचिन पांडूळे ,यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. चेक ( धनादेश ) ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा.पुढील क्रमांकावर फोन करावा आणि या कार्यात सहभागी व्हावे .संदीप बर्वे,9860387827,जांबुवंत मनोहर 9028633720 ,सचिन चौहान 9637428888,असे आवाहन करण्यात आले आहे.
देणगी पाठवण्यासाठीचा तपशील :
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code SBIN0020734