भाषा जपावीच, पण, कंटेंट जास्त सांभाळा ‘ : परिसंवादाचा सूर

Date:

पुणे:
‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल ‘ मधील ‘ समाजाची बदलती भाषा ‘ या परिसंवादाला शनीवारी दुपारी  चांगला प्रतिसाद मिळाला.पं. नेहरु सभागृहात हा परिसंवाद चांगलाच रंगला. सतत बदलत जाणारी भाषा जपावीच, पण, कंटेट जास्त सांभाळा ‘ असा या परिसंवादाचा सूर होता !
‘शतरंज के खिलाडी ‘, ‘उमराव जान ‘ सारख्या हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ संवाद लेखक जावेद सिद्दीकी, पत्रकार विजय चोरमारे, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पत्रकार सचिन चपळगावकर, अॅड. सुजाता पाठक, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक श्रावण खरात या परिसंवादात सहभागी झाले.
 संवाद लेखक जावेद सिद्दीकी म्हणाले,’ लेखक लिहितो तेव्हा तो स्वतः बोलत असतो, पण चित्रपटातील पात्र बोलते, तेव्हा ती पात्राची भाषा असावी लागते. पुढची पिढी देखील हे संवाद ऐकणार, वाचणार आहे, याचे भान ठेवले पाहिजे. भाषा बदलत आहे, पण ती अशीच बदलली पाहिजे का ? याचा विचार केला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, जुन्या कथाची पखरण असलेली  भाषा आपण विसरलो आहोत. एसएमएस ची नवीच भाषा जन्माला आली आहे.
सिद्दीकी पुढे म्हणाले, ‘आपल्या भाषेवर इतिहास, भूगोलाची छाप असते. भाषा बदलत गेली तरी लेखकाची जबाबदारी बदलत नाही.आपल्याला स्वतःच चांगल्या -वाईटाची सेन्सॉरशिप करता आली पाहिजे, त्यासाठी वेगळी समिती असली तरच ऐकू, असे वाटता कामा नये.टीव्हीवरचे डिबेटमध्ये चर्चक एकमेकांचे ऐकू शकत नाहीत, तर, आपण ते कसे ऐकू शकणार ?
इंटरनेट वर , वेब सिरीजवरची भाषा त्या ठिकाणी योग्यच आहे, असे वाटली तरी ती घसरून चालणार नाही.
पत्रकार विजय चोरमारे म्हणाले,’ आपण जो शब्द लिहितो, छापून येतो त्या साठी अनेकांना जबाबदार धरले जाते, त्यामुळं वृत्तपत्रात प्रत्येक शब्द जपून लिहावा लागतो. आताच्या काळात जबाबदारी अधिक वाढली आहे. घाई असणे ही तुमच्या चुकीचे समर्थन करता येत नाही. भाषेच्या व्याकरणापेक्षा कंटेंटची काळजी घेतली पाहिजे.
चपळगावकर म्हणाले, ‘ मीडिया हाऊसेसची भाषा बदलल्याने पत्रकारांना फार बदलता येत नाही. समाज माध्यमांची,राजकारण्यांची भाषा ही प्रभाव टाकत असते.टीआरपीची भाषा ही समाज संस्कृती जपणारी नाही.
अॅड. सुजाता पाठक म्हणाल्या, ‘ नाटकांची वाक्ये आता पल्लेदार नसतात, तर तुटक असतात. समाजाचेच प्रतिबिंब नाटकात पडत असते.
‘ आशय फिल्म यु ट्यूब चॅनेल ‘ चे श्रावण खरात म्हणाले, ‘इंटरनेट वर फिल्म करताना बंधने नसली, तरी स्वतःवर स्वतःची बंधने घालून घेणे हितकारक ठरते.
संयोजक मोनिका सिंग यांनी सर्वांचा सत्कार केला.आर जे तरुण यांनी सूत्रसंचालन केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल...

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

'१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची' (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली....