Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रियदर्शिनी गोविंद यांच्या ‘भरतनाटयम’च्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Date:

‘संप्रदाय- अनफोल्डींग द ट्रॅडीशन्स’ कार्यक्रमाला रसिकांची वाहवा !
पुणे :‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार विजेत्या भरतनाट्यम कलाकार प्रियदर्शिनी गोविंद यांच्या भरतनाट्यमच्या ‘संप्रदाय- अनफोल्डींग द ट्रॅडीशन्स’ कार्यक्रमाने आज नृत्य रसिकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे प्रथमच पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध चित्रपट कलाकार अमोल पालेकर यांच्या हस्ते प्रियदर्शनी गोविंद यांचा सन्मान करण्यात आला. ‘नृत्ययात्री’ संस्थेच्या संस्थापक मेघना साबडे यांनी स्वागत केले.
  ‘नृत्ययात्री’ संस्थेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर, येथे ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.
पुणे रसिकांच्या भरघोस प्रतिसादात आणि उत्साहात कार्यक्रमाची सुरुवात ‘कार्तिके’यावर आधारित श्लोकाने झाली. ‘वर्णम’ या नृत्यप्रकारातून शंकरांच्या वेगवेगळ्या रुपांचे आणि आभूषणांचे वर्णन केले गेले.
यानंतर प्रियदर्शनी यांनी काही अभिनय प्रधान रचना सादर केल्या. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलाच्या आईची मनस्थिती रसिकांसमोर मांडण्यात आली, तर पुढच्या पदातून स्वतःचा नवरा परदेशी गेल्यावर प्रियकराला बोलावून घेणारी मिश्किल स्त्री सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता तिल्लाना आणि अभंगाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्यातील प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक परिमल फडके यांनी केले.
कार्यक्रमाला नृत्ययात्रीच्या मेघना साबडे, श्रद्धा पळसुळे, मालती कलमाडी, प्राची जावडेकर, योगेश गोगावले तसेच पुण्यातील सर्व नृत्यगुरू आदी उपस्थित होते.
 प्रियदर्शिनी गोविंद, सध्याच्या पिढीतील भरतनाट्यममधील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. संगीत नाटक अकॅडमी २०१२ च्या त्या विजेत्या आहेत.
 
‘नृत्ययात्री’ संस्थेविषयी 
मेघना साबडे यांनी स्थापन केलेली व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली नृत्ययात्री ही पुण्यातील संस्था गेली अनेक वर्षे पुण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी जगविख्यात नृत्यकलाकार – गुरू, नृत्यसंस्था यांचे शास्त्रीय नृत्यातील उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करत आलेली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारनगरमध्ये ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग

पुणे-एका ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात...

पुणे वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराची आत्महत्या:मुलं शाळेतून आल्यावर घरात दिसला वडिलांचा मृतदेह

पुणे-पुणे पोलिस दलातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन...

ना कोयता थांबतोय, ना कट्टा ,ना मॅफेड्रॉन ..पुण्याला बसतोय विळखा

पुणे- राजकारण प्रत्येक पक्षात शिगेला पोहोचलेले असताना ते एकमेकावर...

पुणे शहरातील गणेशोत्सव सर्व दिवस 24 तास खुला राहण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून पाठपुरावा सुरु

पुणे (दि २०): राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून...