‘युनिक इंग्लिश मीडियम स्कूल’चा दहावीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकाल
निशिगंधा ढगे 94.20 टक्के मिळवून शाळेत प्रथम
पुणे: ‘ईगल एज्युकेशन सोसायटी’ संचालित कात्रज कोंढवा रोडवरील ‘युनिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॅालेज’चा माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला. निशिगंधा ढगे हिने 94.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. शाळेचा सतत सातव्या वर्षी 100 टक्के निकाल लागला आहे.
संतोषी देवासी हिने 93.60 टक्क्यांसह दुसरा; तर श्वेता मुंढे हिने 92.60 टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला. पुरब खोपडे 92.20 टक्के, गुलनाज शेख 91.80 टक्के, प्रगती चव्हाण 90.80 टक्के मिळवून या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक डॉ.आर. ए. मुलाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव व उपमुख्याध्यापिका सुनिता चांदगुडे तसेच शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले.
शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये एकूण 65 विदयार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 32 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.