‘बायो सीएनजी’ क्षेत्रातील योगदानाबद्दल नितीन देशपांडे यांचा गौरव
पुणे :
कृषी-औद्योगिक क्षेत्रातील वेस्ट (कचऱ्या) पासून बायो सीएनजी आणि बायो कंपोस्टिंग प्रकल्प उभारणीच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ‘‘ट्रायोकेम सुक्रोटेक इंजिनियरिंग अॅण्ड प्रोजेक्टस् प्रा.लि.’ ( Triochem Sucrotech Engineering and Projects pvt.ltd.Pune) चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांचा थायलंड येथे ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ देऊन गौरव करण्यात आला.
सहाव्या ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल्स इन शुगर अॅण्ड इंटीग्रेटेड टेक्नॉलॉजिज’ या परिषदेत मंगळवारी, 6 मार्च रोजी हा गौरव कार्यक्रम झाला.
थायलंडच्या उडोन थानी प्रांताचे राज्यपाल वॅटना पुट्टीचॅट यांच्या हस्ते देशपांडे यांना ‘एक्सलन्स अॅवार्ड’ (गुणवत्ता सन्मान) देऊन गौरविण्यात आले.