‘या उपक्रमामध्ये वही -पेन, पेन्सिल, खोड रबर इत्यादी शालेय वस्तू स्वीकारण्यात आल्या. जमा झालेल्या वस्तू गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच गरजू अनाथ मुलांना वाटण्यात येणार आहेत. रयतेला साक्षर बनविण्याचे शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करण्याचा आमच्या प्रतिष्ठानचा हा एक छोटासा प्रयत्न आहे’, अशी माहिती आयोजक अजिंक्य चव्हाण आणि शुभम खामकर यांनी दिली.
‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ उपक्रमास चांगला प्रतिसाद
पुणे :
‘शिवप्रतिष्ठान’ गणेश नगरच्या वतीने शिवजयंतीनिमित्त ‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून आगळी वेगळी शिवजयंती प्रतिष्ठानने साजरी केली, अशी माहिती ‘शिवप्रतिष्ठान’ च्या वतीने उपक्रम आयोजक किशोर खामकर, अजिंक्य चव्हाण, शुभम खामकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
या उपक्रमांतर्गत वही 830 नग, पेन 450 नग, पेन्सिल 300 नग आणि खोड रबर 300 आणि रंगपेटी 57 नग जमा झाले आहे. सिद्धेश फाले, साहिल सातपुते, भूषण परबते, ओंकार खामकर, सौरभ विधाते, अर्जुन देमाणे, सोहम आवळे, हर्षल जाधव, प्रतीक ढावरे, स्वप्नील खामकर, स्वप्नील आंबुरे यांनी या उपक्रमात सहकार्य केले आहे.
या उपक्रमाची माहिती देताना किशोर खामकर म्हणाले, ‘शिवप्रतिष्ठान’ गणेश नगर, सात चाळ पूरग्रस्त वसाहत एरंडवणे येथील युवकांच्या वतीने गेली 6 वर्षे घराच्या अंगणात शिवजयंती साजरी करण्यात येते. अनेक शिवभक्त या दिवशी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अथवा हार अर्पण करतात. यावर्षी आम्ही ‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ ही मोहीम हाती घेतली. ह्या मोहीमेतंर्गत शिवरायांच्या चरणी हार, पुष्प न वाहता फक्त ‘एक वही, एक पेन अर्पण’ करा असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.’