पुणे-पोस्टर बॉईज नंतर पोस्टर गर्ल करायला खूप अभिमान वाटतो , पण हा धाडसी निर्णय आहे . स्त्री भ्रूण हत्येचा विषय विनोदी अंगाने मांडला आहे …हा सिनेमा १२ फेब. ला प्रदर्शित होतो आहे . या दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील पहा काय म्हणाले …
————————————
घेतले सिद्धी विनायकाचे दर्शन ….
12 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या पोश्टर गर्ल या सिनेमाची टीम नुकतीच
सिध्दिविनायकाच्या दर्शनाला जाऊन आली. चित्रपटाचा विषय वेगळा आहे. त्याचे वेगळेपण या
चित्रपटासाठी काम करणाऱ्या प्रत्येकानेच जपलेले आहे. आपली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत
तितक्याच चांगल्या पध्दतीने पोहोचावी यासाठी बाप्पाचे आशिर्वाद नेहमीच गरजेचे असतात आणि
हेच मागणे मागण्यासाठी पोश्टर गर्ल ची टीम प्रभादेवीच्या सिध्दिविनायक मंदिरात गेली होती.
आपला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा हे मागणं मागताना या टीम ने भारतवर्षात सुखाची
नांदी व्हावी असे साकडे ही सिध्दिविनायकाला घातले.
एक गंभीर विषय विनोदाचा मुलामा चढवून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे खूप मोठे कसब
आहे…चित्रपटाच्या या वेगळेपणाला प्रेक्षकांची दाद मिळावी यासाठी…चित्रपटाचे कथा, पटकथाकार
आणि अभिनेते हेमंत ढोमे यांनी सिध्दिविनायकाला साकडे घातले तर चित्रपट बनवल्यानंतर तो
प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल की नाही ही धाकधूक दिग्दर्शकाला असतेच…माझी ही अवस्था देवापुढे
मांडली असल्याचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी म्हटले आहे.
पोश्टर गर्लच्या भूमिकेत असणारी सोनाली कुलकर्णी, चित्रपटाची कथा, पटकथा आणि अभिनय
अशा तिहेरी भूमिकेत असणारे हेमंत ढोमे, चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील, चित्रपटाचा बाज
लक्षात घेऊन संगीत देणारे संगीतकार अमितराज, चित्रपटाची नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर
यांच्याबरोबर चित्रपटाचे निर्माते पुष्पांक गावडे आणि हादी अली अब्रार ही बाप्पाच्या दर्शनाला गेले
होते.
सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो
फिल्म बनायें यांचा ‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा येत्या 12 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत
आहे.