“पोलिसांनाही बोनस मिळावा, महाराष्ट्र प्रदेश पोलिस मित्र संघटनेची मागणी

Date:

पुणे-“सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळत असताना मात्र पोलिसांना अनेक वर्षे बोनस मिळाला नाही,हा अन्याय असून पोलिसांना बोनस मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र ‌कपोते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे केली आहे.इतर शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा असतो, पोलिसांना मात्र २४ तास ड्युटी असते.रोज १२ ते १५  तास ड्युटी करावी लागते, स्वतःच्या तब्येतीकडे , कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.शांताव सुव्यवस्थेची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्या खांद्यावर असते.याचबरोबर सणसुद, मोर्चे, आंदोलने, मंत्री यांचे दौरे,व्ही.आय.पी व्यक्ती यांच्यासाठी बंदोबस्त, त्याचबरोबर आपत्कालीन संकटे,पाउस, यासाठी पोलिसांना जुंपले जाते.गेल्या कोरोनाकाळात तर सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली.गर्दीवर नियंत्रण ठेवण्यापासून ते  अंम्बुलंस मिळवून देण्यासाठी सर्व कामे पोलिसांना करावी लागली.कोरोनामुळे अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.पोलिसांमुळे कोरोंना आटोक्यात आला.महाराष्ट्राच्या सुरक्षेची सर्व भिस्त पोलिसांवर असताना मात्र त्यांना बोनस पासून डावलण्यात येते.पोलिसांना  संघटना नसल्यामुळे त्यांना आवाज उठवता येत नाही.तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.विरोधी पक्ष यावर आवाज उठवतात, मात्र स्वतः सत्तेत आल्यावर सोईस्करपणे हा विषय सोडून देतात.इतर कुठल्याही शासकीय कामात जीवाची जोखीम नसते. मात्र पोलिसांना जीवाची जोखीम घेऊन काम करावे लागते. सर्वांना बोनस मिळत असताना पोलिसांना बावरते बरोबर आहे का? सर्व म्हणतात हे सरकार जनतेचे आहे.तर मग पोलिसांना त्वरित एक महिन्याचा बोनस जाहीर करावा अशी मागणी संघटनेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आली.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात टँकरने पाणी पुरवण्यासाठी महापालिका करणार २१ कोटी चा खर्च

म्हाळुंगे, वाघोली, शेवाळेवाडी-मांजरी, वडगाव शेरीसह समाविष्ट गावांसाठी टँकर पुरवठा;...

पोलिसांनी परवानगी नाकारली; तरी दहीहंडीत लावणीचा कार्यक्रम,भूषण सोनावणे, अमोल काटेसह तिघांवर गुन्हा

लावणी नृत्यांगना राधा पाटीलसह आयोजकांवर बिबवेवाडी पोलिसांची कारवाई; आवश्यक...

पुणे महापालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रक्रिया सुरू

४० शिक्षकांची होणार निवड; ८ ते २२ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन...