शिव्या देऊन नौकरी लागेल, महागाई कमी होईल ? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Date:

पुणे : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धीच म्हणायची वेळ आली. आई वडिलांना शिव्या द्या चालेल, आईवरुन शिव्या देणं कोल्हापूरची पद्धत आहे असं सांगता पण अहो कुणालाच शिव्या देऊ नका, असं अजित पवार म्हणाले.अशा शिव्या देऊन नौकरी लागणार आहेकाय ? कि महागाई कमी होणार आहे ? असे सवाल देखील त्यांनी मंत्री पाटलांना केले .

अहो आपली संस्कृती, परंपरा, इतिहास काय सांगतो दोन व्यक्तींनी काय कुणीच कुणाला शिव्या देऊ नये. शिव्या देऊन नोकरी लागणार आहे काय ?, महागाई कमी होणार आहे काय ?, कुणीच कुणाला शिव्या देऊ नये. एवढ्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तसं बोलू नये. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मिळाल्यानं ते कदाचित नाराज असतील, त्यामुळं त्याचं संतुलन राहिलं नाही का हे कळायला मार्ग नाही, असं अजित पवार म्हणाले.चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षापासून आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी प्लॅनिंग करत होतो, असं म्हणाले होते. यावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं आहे. भाजपच्या १०५ जागा आल्यानंतरही उद्धव ठाकरेंचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली होती. या सर्वामागं मोठ्या शक्तीचा हात असल्याशिवाय हे शक्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात टँकरने पाणी पुरवण्यासाठी महापालिका करणार २१ कोटी चा खर्च

म्हाळुंगे, वाघोली, शेवाळेवाडी-मांजरी, वडगाव शेरीसह समाविष्ट गावांसाठी टँकर पुरवठा;...

पोलिसांनी परवानगी नाकारली; तरी दहीहंडीत लावणीचा कार्यक्रम,भूषण सोनावणे, अमोल काटेसह तिघांवर गुन्हा

लावणी नृत्यांगना राधा पाटीलसह आयोजकांवर बिबवेवाडी पोलिसांची कारवाई; आवश्यक...

पुणे महापालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रक्रिया सुरू

४० शिक्षकांची होणार निवड; ८ ते २२ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन...